शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सामाजिक वनीकरण, प्रादेशिक होणार एकत्र!

By admin | Published: June 06, 2017 12:02 AM

वन विभागातील विविध विभागांचे होणार विलिनीकरण

बुलडाणा : वन विभागाच्या अंतर्गत विविध विभाग आहेत; मात्र यामध्ये आता बदल करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला असून, सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वन विभागाचे विलिनीकरण करण्यात येणार आहे. राज्यात असलेल्या जंगलाचे रक्षण करण्याकरिता वन विभागाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर प्रादेशिक, सामाजिक वनीकरण, व्याघ्र प्रकल्प असे विविध विभाग तयार करण्यात आले. सामाजिक वनीकरण अंतर्गत वन विभागाच्या ताब्यात नसलेल्या जमिनीवर वृक्ष लागवड करून जमीन विकसित करण्याचे काम सोपविण्यात आले, तसेच राज्यात व्याघ्र प्रकल्प घोषित करून वाघांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर वृक्षारोपण करून या जंगलातील वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रादेशिक वन विभागावर सोपविण्यात आली. अनेक वर्षांपासून याप्रकारे कारभार सुरू असतानाच यामध्ये व्यापक बदल करण्याचा निर्णय वन मंत्रालयाने घेतला आहे. सामाजिक वनीकरण व प्रादेशिक वन विभागाचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण व प्रादेशिकचे वेगळे अधिकारी व कर्मचारी असतात; मात्र आता एकाच अधिकाऱ्याकडे दोन्ही विभाग सोपविण्यात येणार आहेत. आतापर्यंत दोन्ही विभागांचे उपवनसंरक्षक अधिकारी वेगवेगळे होते. आता मात्र एकच राहणार आहेत. आगामी काळात कर्मचाऱ्यांचेही एकत्रीकरण करण्याच्या तयारीत वन मंत्रालय आहे. दोन्ही विभाग वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचे काम करीत असल्यामुळे एकच अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्याच्या मानसिकतेत आहे. लवकरच कर्मचारी स्तरावरही एकत्रीकरण होणार आहे. वन मंत्रालयाच्यावतीने सामाजिक वनीकरण व प्रादेशिकचे एकत्रीकरण करण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवर तसे बदल झाले आहेत; मात्र अजून कर्मचाऱ्यांचे एकत्रीकरण व्हायचे आहे.- बी. ए. पोळ सहा. उप-वनसंरक्षक, वन विभाग, बुलडाणा.