चोरीचा तपास थंड बसत्यात
धाड: बुलडाणा तालुक्यासह धाड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. परंतु चोरीचा तपास सध्या थंड बस्त्यात राहत असल्याने चोरट्यांना अभय मिळत आहे.
थुंकण्यावरील प्रतिबंधाची अंमलबजावणी
बुलडाणा: शाळेच्या परिसरात थुंकण्यावरील बंदीच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. यासोबतच शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे की चौकोन, वर्तुळ आखून ठेवलेले असणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीची कर वसुली माेहीम प्रभावित
दुसरबीड : काेराेनामुळे ग्रामपंचायतींची कर वसुली माेहीम प्रभावित झाल्याचे चित्र आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुली हाेत नसल्याने ग्रामीण भागातील विकास कामेही प्रभावित झाली आहेत. शासनाकडूनही अनुदान मिळत नसल्याचे चित्र आहे.
ग्रामीण रस्ते डांबरीकरणाविना!
डोणगाव : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते बांधकाम केले जाते. मात्र अनेक गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या पावसाने तर शहरी तसेच ग्रामीण रस्त्यांची वाट लागली आहे.