सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव
लोणार : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची कुचंबना होते. अस्तित्वात असलेले सार्वजनिक शौचालय सोयीसाठी उघडे करून देण्यात यावे, अशी मागणी वैभव गाडे यांनी केली आहे.
ठिबक, तुषार सिंचन वाढीव अनुदानाची प्रतीक्षा
अंढेरा: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात शासनाकडून सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली. यासाठी तुषार ठिबक संचला ८० टक्के अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु ३० टक्के वाढीव अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही.
मका लागवडीतून गवसला समृद्धीचा मार्ग
हिवरा आश्रम : यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने पीक चांगले आले आहे. मका पिकाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग गवसला आहे.
कलिंगडाला लाॅकडाऊनमुळे भाव नाही
धामणगाव बढे : काेराेनाचा वाढता प्रभाव आणि वेळोवेळी जाहीर होणारी संचारबंदी यामुळे कलिंगड या फळाला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच विक्री करावी लागत आहे. मागणी नसल्याने कलिंगडाचे भाव काेसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
काेराेना राेखण्यासाठी समित्या स्थापन करा
माेताळा : शहरासह तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी गावागावात समित्यांची स्थापना करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हाेत आहे.
रिक्त पदांमुळे विकासकामे रखडली
बुलडाणा : विविध विकासकामे ही बांधकाम विभागाशिवाय हाेणे शक्य नाही. या विभागात ३५ अभियंत्यांच्या भरवशावर ११०० पेक्षा अधिक गावांचा डाेलारा उभा आहे. पंचायत समित्या आणि सहा उपविभागीय कार्यालयांत ही पदे रिक्त आहेत.
व्यावसायिकांची चाचणीकडे पाठ
डाेणगाव : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने कोरोनाविषयी जनजागृती सुरू केली आहे. व्यावसायिकांनी काेराेना चाचणी करावी, असे आवाहन करण्यात आले हाेते. मात्र, अनेकांनी काेराेना चाचणीकडे पाठ फिरविली आहे.
दुकानदारांना काेराेना चाचणी बंधनकारक
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, कोविड नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत दुकानदारांची काेराेना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
उपाययाेजनांमुळे काेराेना रुग्णसंख्या आटाेक्यात
माेताळा : जिल्हाभरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे काही तालुक्यांमध्ये ठाेस उपाययाेजना केल्याने काेराेना रुग्णसंख्या आटाेक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
कर वसुलीसाठी ग्रा.पं. सरसावल्या
बुलडाणा : थकीत कर वसुलीसाठी ग्रामपंचायतींच्या वतीने विविध उपाययाेजना राबण्यात येत आहेत. माेताळा तालुक्यातील स्मार्ट ग्राम शेलगाव बाजार येथे कराचा भरणा करणाऱ्यांना १०० किलाे डाळ माेफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, कारवाई थंडावली
डोणगाव : येथे प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिक वस्तूंचा सर्रास वापर होत आहे. फळविक्रेते, किराणा व्यावसायिक व इतर दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसून येत आहे. कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे लक्ष असल्याने याकडे दुर्लक्ष होत आहे.