चिखली : तालुक्यातील शेलोडी येथील रोहित्र सातत्याने जळत आहे. त्यामुळे शेलोडी येथील रोहित्राची समस्या सोडविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात महावितरणकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
---
इयत्ता नववी- अकरावीच्या परीक्षेचा पेच
बुलडाणा : इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, इयत्ता ९ वी ते अकरावीपर्यंतच्या परीक्षेचा पेच अद्यापही कायम आहे. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेण्यात येत आहेत.
----
कोरोना चाचणीच्या अहवालास विलंब
बुलडाणा : कोरोना चाचणीच्या अहवालास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक कोरोना बाधित रूग्ण अनेकांच्या संपर्कात येत असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्येत सातत्याने भर पडत असल्याचे दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
बुलडाणा : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी विनोद गावंडे, राहुल कसबे, गोवर्धन तेलंग, विजय बिजवे, संजय गवई, विवेक जाधव आदी उपस्थित होते.
श्रीगोंद्याच्या कागदी लिंबाची आवक
बुलडाणा : येथील बाजारपेठेत श्रीगोंदा येथील कागदी लिंबांची आवक वाढली आहे. उन्हाळ्यात लिंबाच्या दरात वाढ होत असून, श्रीगोंद्याचे कागदी लिंबू बुलडाणाच्या बाजारात भाव खात आहेत. रसाळ आणि दर्जेदार फळामुळे या लिंबाना ग्राहकांची पसंती आहे.
----
धाड येथे लसीकरण शिबिराला प्रतिसाद
बुलडाणा : तालुक्यातील भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तपासणी करून गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
---
रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी
मोताळा : नांदुरा-मोताळा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी बांधकाम विभागाने या रस्त्यावर पाणी मारावे, अशी मागणी संतोष वानखडे यांनी शनिवारी केली.
----
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
बुलडाणा : मागील काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. शहरात सगळीकडे मोकाट कुत्र्यांचे घोळकेच्या घोळके फिरत असून लोकांच्या अंगावर चवताळून जात आहेत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
लघु व्यावसायिकांना स्वतंत्र जागा द्या
बुलडाणा : मागील गेल्या कित्येक वर्षांपासून बुलडाणा रोडवरील विश्रामगृहाच्या बाजूला अतिक्रमित असलेली दुकाने हटवण्यात येत आहेत. या लघु व्यावसायिकांना पर्यायी जागा देण्यात यावी, अशी मागणी संजय गांधी लघुउद्योजक संघाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सोमवारी केली.
नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन
मोताळा : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे गर्दी होईल,असा कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याची दक्षता आयोजकांनी घेणे आवश्यक आहे. पूर्वी पाळलेली शिस्त यापुढेही पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा
मोताळा : गावातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने वाहनचालकांना वाहने चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावाची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अतिक्रमणाने रस्ते अरुंद झाले आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
कृषीपंपाच्या वीजजोडण्या रखडल्या
मोताळा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी महावितरणकडे कृषीपंपाच्या वीजजोडणीसाठी अर्ज केले आहेत. मात्र यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या रखडल्या आहेत. या शेतकऱ्यांचे अर्ज तत्काळ निकाली काढण्याची मागणी संतोष तायडे यांनी सोमवारी केली आहे.
लाभार्थी घरकूल अनुदानापासून वंचित
बुलडाणा : गरिबांना घर मिळावे, यासाठी शासनाने घरकूल योजना सुरू केली आहे. लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनदेखील त्यांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी गणेश बोचरे यांनी सोमवारी केली.
------------