बुलडाणा: बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून वरिष्ठांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंद्रशेखर चंदन यांनी शुक्रवारला दिला. राणा चंदन यांच्या नेतृत्वात इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखा व्यस्थापकांची भेट घेवून त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राणा चंदन, शे. रफिक शे. करीम, हरीभाऊ उबरहंडे, दत्ता जेऊघाले, पंजाबराव जेऊघाले, कडूबा मोरे, निर्मल ठेंग यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरले. संबंधीत बँकेचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणाकडे दुर्लक्ष करतात, कर्जप्रकरण करण्यास टाळाटाळ करतात अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या आल्या आहेत. राणा चंदन व त्यांच्या पदाधीकाऱ्यांनी इंडियन ओवरसीस बँकेचे अधिकारी यांची भेट घेतली व त्यांना जाब विचारला. दरम्यान, येत्या चार दिवसात शेतकऱ्यांच्या उर्वरीत कर्ज प्रकरणे मार्गी न लावल्यास बँकेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे निकाली न काढल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:45 PM
बुलडाणा: बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असून वरिष्ठांनी याची दखल घेवून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंद्रशेखर चंदन यांनी शुक्रवारला दिला.
ठळक मुद्दे राणा चंदन यांच्या नेतृत्वात इंडियन ओवरसीज बँकेच्या शाखा व्यस्थापकांची भेट घेवून त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. कर्ज प्रकरणे मार्गी न लावल्यास बँकेच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.