जेथे-जेथे मेंढ्यांसाठी चारा सापडेल, त्या शेतशिवारात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत असतात. अनेक शेतकरी आपल्या शेतात लेंडीखत आणि मूत्र मिळावे म्हणून एका रात्रीचे ८०० ते एक हजार रुपये देऊन आपल्या शेतात मेंढ्या बसवितात. रासायनिक खताच्या वापरापेक्षा मेंढ्यांचे हे खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त असते. अनेक ठिकाणी मेंढ्या बसविल्यानंतर किंवा ज्या परिसरात नांगरणी केली आहे, अशा ठिकाणांहून मेंढपाळ आपला मुक्काम हलवून दुसऱ्या गावातील शेतीशिवारात स्थलांतर करतात. आठ दिवस, पंधरा दिवस, कधी महिन्याभरात मेंढपाळांना दुसऱ्या गावात स्थलांतर करावे लागते. पावसाळ्यातील चार महिने मेंढपाळ लोक आपल्या गावी राहिल्यानंतर मेंढ्यांच्या चराईसाठी दुसऱ्या जिल्ह्यात व तालुक्यात दरवर्षी स्थलांतर करीत असतात. बुलडाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मेंढपाळ दाखल झाले हाेते़ पावसाची शक्यता पाहता ते आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत़
पावसाळ्याची चाहूल लागताच मेंढपाळ परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:26 AM