लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : मोताळ्यासह परिसरात सध्या उन्हाचा पारा जबरदस्त वाढला आहे. काही दिवसांपासून तापमान ४२ अंशापर्यंत जाऊन पोहोचल्याने तालुकाभरातील जीवनमान विस्कळीत झाले आहे. चढत्या पाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीपूर्व मशागती लटकल्या आहेत.मागील पंधरवड्यापासून मोताळा परिसरात तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार होत आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि काही प्रमाणात वारा यामुळे तापमान घसरले होते. मात्र, आठवडाभरापासून ४२ अंशापर्यंत गेलेले तापमान ३८ ते ३९ अंशापर्यंत कायम आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. रविवारचे तापमान ४२ अंशापर्यंत कायम होते. तापमानातील या अचानक बदलांमुळे नागरिकांना विविध आजारांनादेखील सामोरे जावे लागत आहे. कडक उन्हामुळे दुपारी परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.
उन्हामुळे पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 12:23 AM