हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: जिल्ह्यातील अल्प जलसाठा आणि सिंचनाच्या अपुर्या सुविधांमुळे शे तकर्यांचा गहू पिकांपेक्षा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे. यावर्षी परतीच्या पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे निर्धारित उद्दिष्टांच्या ५५ टक्के क्षेत्रावर हरभर्याची पेरणी झाली आहे. गेल्या महिन्यात परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच एकाच वेळी कापूस, सोयाबीन काढणीस आले होते. त्यामुळे मजुरांना मागणी वाढली होती. अनेक शे तकर्यांना वेळेवर मजूर मिळाले नसल्याने पीक जागेवरच पडून राहिले. त्यामुळे शे तकर्यांचे नुकसान झाले. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले असले तरी हा पाऊस रब्बी हंगामासाठी आशादायी ठरला आहे. जमिनीमध्ये ओलावा असल्याने व हरभरा काढण्यासाठी लागणारा कमी खर्च गृहीत धरून शेतकरी हरभरा पिकाकडे वळले आहेत. काही शेतकर्यांकडे पाण्याची उपलब्धता असतानाही ते हरभरा पीक घेत आहेत. कोरडवाहू व कमी पाण्यात पीक चांगले उत्पादन देते व बाजारातही भाव टिकून असतात. यामुळेच शेतकर्यांचा हरभरा पिकाकडे कल वाढला आहे.
चार्यासाठी ज्वारी, मक्याची लागवडकापूस, सोयाबीन काढणीनंतर यापूर्वी मका, ज्वारीचे पीक घेतले जात आहे; परंतु मका, ज्वारी काढण्यासाठी मजूर नकार देत असल्याने केवळ चार्यासाठी ज्वारीची पेरणी केली जात आहे; मात्र ज्वारी काढणीसाठी मजूर धजावत नसल्याने व उत्पन्ना पेक्षा खर्च अधिक होत असल्याने केवळ चारा उपलब्ध व्हावा म्हणून ज्वारी पीक घेतले आहे. इतर क्षेत्रावर हरभर्याची पेरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया बुलडाणा तालुक्यातील दत्तपूर येथील शेतकरी सुहास वानरे यांनी दिली. तर कमी पाण्यात उत् पन्न जास्त मिळत असल्यामुळे दोन वर्षांपासून हरभरा पिकाची लागवड करीत आहोत. यावर्षी ४0 एकरावर हरभरा पिकाची लागवड केली असल्याची माहिती बुलडाणा तालुक्यातील खुपगाव येथील शेतकरी नामदेव जाधव यांनी दिली.
७३ हजार ९१0 हेक्टरवर हरभर्याची पेरणीरब्बी हंगामात जिल्ह्यासाठी हरभरा पिकाचे १ लाख ३४ हजार ३९४ हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी ७३ हजार ९१0 हेक्टर क्षेत्र हे हरभर्यासाठी राखीव होते. त्यापैकी ११ नोव्हेंबर पर्यंत ४0 हजार ५0२ हेक्टर क्षेत्रावर हरभर्याची पेरणी झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ टक्के हरभर्याची पेरणी पूर्ण झाली आहे. १३ तालुक्यापैकी सर्वात जास्त हरभरा पेरणी चिखली तालुक्यात १३ हजार ११, बुलडाणा तालुक्यात १0 हजार २१३, त्यानंतर लोणार तालुक्यात ५ हजार ९२४ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी करण्यात आली आहे.