खामगाव : मृग नक्षत्राच्या स्वागताला बरसलेल्या पावसाने दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर या आठवड्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. सोमवारपर्यंंत जिल्हय़ात २ लाख १८ हजार १४४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे.पावसाच्या लहरीपणामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांना यावर्षी हवामान खात्याने दिलासा दिला. जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच दमदार पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यामुळे शेतकर्यांनी मे महिन्यातच शेती मशागतीची कामे पूर्ण केली. दरम्यान, नेहमीच हुलकावणी देणार्या पावसाने यावर्षीही हवामान खाते व जाणकारांचे अंदाज चुकवीत जूनच्या तिसर्या आठवड्यापर्यंत दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे जून महिन्याच्या दोन आठवड्यापर्यंंत केवळ मॉन्सूनपूर्व कपाशीचीच लागवड करण्यात आली होती. २0 जूनपासून जिल्हय़ात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाने यावर्षी सर्वाधिक ३ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले आहे.
बुलडाणा जिल्हय़ात दोन लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी
By admin | Published: June 29, 2016 12:16 AM