लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात घाटावर दमदार पाऊस होत असताना घाटाखालील शेगाव, मलकापूर, संग्रामपूर, खामगाव व जळगाव जामोद तालुक्यात दमदार तसेच दोन ते तीन दिवसांआड आवश्यक असणार्या पावसाअभावी अध्र्यापेक्षा जास्त पेरण्या रखडल्या आहेत. यावर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले होते. त्यानंतर जूनच्या दुसर्या आठवड्यात मान्सूनचा पाऊसदेखील जिल्ह्यात सर्वत्र बरसला. जिल्ह्यातील घाटावर दमदार पाऊस बरसला असताना, घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, संग्रामपूर या तालुक्यात १00 मिमीच्या आसपासच पाऊस बरसला आहे. अधूनमधून पाऊस होत असतानाही पेरणीयोग्य दमदार पाऊस झाला नाही. यामुळे दुबार पेरणीचे संकट पाहता या तालुक्यातील अध्र्याहून अधिक शेतकर्यांनी पेरण्या थांबविल्या आहेत. आतापर्यंंत या पावसाची या तालुक्यातील आकडेवारी पाहिली असता शेगाव तालुक्यात ७0 मिमी, मलकापूर ८0 मिमी, संग्रामपूर ८६ मिमी, खामगाव १0७ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. १00 मिमीच्या आसपास पाऊस झाला असला, तरी पावसातील खंडामुळे जमिनीतील ओल सुकत आहे. पेरणीनंतर पाऊस येईल की नाही, यामुळे ह्यदुधाने तोंड पोळले ताकही फुंकून प्याह्ण याप्रमाणे दुबार पेरणीचे संकट पाहता शेतकरी पेरणी करण्याच्या मानसिकतेत नाही. ज्या शेतकर्यांकडे विहीर, नदी-नाल्यांचे पात्रातील पाणी अशी सिंचनाची व्यवस्था आहे, अशाच शेतकर्यांनी पेरणी उरकली आहे. मात्र कोरडवाहू क्षेत्रफळावरील पेरणी अद्याप बाकी आहे. या तालुक्यांमध्ये झालेल्या पावसाची आकडेवारी १00 मिमीचे जवळपास असली, तरी यापैकी काही महसूल मंडळात १00 पेक्षा जास्त, तर काही महसूल मंडळात आकडेवारीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. ज्या महसूल मंडळात जास्त पाऊस झाला, अशा शिवारातील पेरण्या उरकल्या आहेत. मात्र, पेरण्या झालेले क्षेत्रफळ नगण्य असून, अद्याप ५0 टक्केचे वर पेरण्या रखडल्या आहेत.
पेरण्या खोळंबल्या!
By admin | Published: June 20, 2017 4:37 AM