लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकर्यांच्या सोयाबीनला हमी भावापेक्षा अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकर्यांची सरकारकडून सर्रास लूट केल्या जात आहे, त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वा त शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर सोयाबीन व का पूस रस्त्यावर फेकून आंदोलन केले. स्वाभिमानीने अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर कडाडून टीका करीत सोयाबीनला किमान ६ हजार तर कापसाला किमान ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव न दिल्यास येत्या काळात संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यात आंदोलन तीव्र करू, असा इशारा यावेळी दिला. राज्य सरकारने यावर्षी सोयाबीनला ३ हजार ५0 रु पये हमी भाव जाहीर केला; मात्र प्रत्यक्षात शेतकर्यांचे सोयाबीन जेमतेम १८00 ते २ हजार रुपयांपर्यंत विकल्या जात आहे. यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यातच हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी केल्या जात असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत् पादन खर्चसुद्धा निघणो कठीण झाले आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राणा चंदन, भगवानराव मोरे, शे.रफिक, बबनराव चेके यांच्यासह अन्य पदाधिकारी शेतकर्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत शे तकर्यांनी सोबत आणलेले सोयाबीन व कापूस रस्त्यावर फेकून आंदोलन केले. याप्रसंगी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, एकूण खाद्य तेलापैकी सोयाबीन तेलाचा वाटा २.६0 टक्के आहे आणि भारत हा सोयाबीन तेल आयात करणारा सर्वांत मोठा देश आहे. दोन वर्षां पूर्वी याच सोयाबीनला ३५00 ते ४५00 भाव होता. आज जेम तेम २ हजार ते २२00 रुपये भाव मिळत आहे. म्हणजे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. गुजरातमध्ये कापसाला बोनस देतात, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मागील दहा वर्षात १४५.२ लाख टन म्हणजे ६९ हजार २00 कोटी रुपयांचे सोयाबीन भारताने आयात केले आहे. सन २0१४-१५ व २0१५-१६ या दोन वर्षात २२ हजार ३00 कोटी रुपयांचे सोयाबीन आयात केले. गेल्या तीन वर्षात सोयाबीन मोठय़ा प्रमाणात आयात झाल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर जाणीवपूर्वक पाडल्या जात असल्याचे तुपकर म्हणाले. येत्या काळात सोयाबीन व कापूस प्रश्नावर संपूर्ण विदर्भात आंदोलन पेटवू, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. या आंदोलनात राणा चंदन, भगवानराव मोरे, बबनराव चेके, शे.रफीक शे.करीम, पं.स.सदस्य नंदिनी कल्याणकर, भारत वाघमारे, नितीन राजपूत, प्रदीप शेळके, गजानन तायडे, पुरुषोत्तम तायडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
‘टीका करण्यापेक्षा भाव द्या’!‘‘लोक सतत आमच्यावर टीका करतात. त्यांनी टीका केल्यापेक्षा सोयाबीनला भाव द्यावा. आम्ही शेतकर्यांच्या प्रश्नावर सतत रस् त्यावर लढणारे कार्यकर्ते आहोत. तथापि, मी व माझे सहकारी या पुढे ताकदीने ही लढाई लढून शेतकर्यांना न्याय मिळवून देणार आहे. १७ गावातील जळालेले ट्रान्सफॉर्मर आपण अधिकार्यांकडून लावून घेतले. तूर घोटाळय़ातील व्यापार्यांवर गुन्हे दाखल करुन घेतले तर उद्योगपतींचे कर्ज माफ करणार्या सरकारला शेतकरी कृषी पंपाची सक्तीची वसुली करताना काहीच वाटत नाही का’’, असा सवाल रविकांत तुपकर यांनी यावेळी उ पस्थित केला.