- अझहर अलीलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी दुकानदारांकडून नामांकित कंपनीकडून उत्पादित सोयाबीन बियाणे खरेदी करून त्याची पेरणी केली, त्या बियाण्याची उगवणच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ४० एकरातील सोयाबीन उगवले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात तालुका कृषी विभागाला ८ गावातील १५ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त आहेत. प्राप्त तक्रारींवर कृषी विभागाचे अधिकारी- कर्मचारी पंचनामे करीत आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. विविध कंपनीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकºयांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.संग्रामपूर तालुक्यातील एकलारा ४, पळशी २, वरवट बकाल २, मोमिनाबाद १, वानखेड ३, काथरगाव १, पिंप्री १, मारोड १ अशा ८ गावातील १५ शेतकºयांनी तालुका कृषी कार्यालयाकडे सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी केल्या. कृषी विभागाला सुरुवातीला एकलारा व पळशी येथील शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अधिकाºयांनी शेत शिवारात जाऊन पंचनामे केले. एक मीटर मधील प्लँट पापुलेशन नुसार सोयाबीन बियाण्याची उगम क्षमता केवळ १० ते १५ टक्के असल्याचे अहवाल कृषी विभागाने शेतकºयांना दिला. त्यामुळे सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाला प्राप्त विविध ८ गावातील १५ तक्रारींमध्ये विविध कंपन्यांचे सोयाबीन उगवले नसल्याचे नमूद आहे. एकूण ४० एकर क्षेत्रफळावरील सोयाबीन उगवले नसल्याने यावर दुबार पेरणी करावी लागणार आहे. रविवारी ६ गावातील ९ शेतकºयांच्या तक्रारीवर कृषी विभागाकडून पंचनामे सुरू होते. बियाणे उगवले नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत करण्याची मागणी पुढे येत आहे.
बियाणे कंपन्यावर कारवाईची मागणीसंग्रामपूर तालुक्यात ४० एकर क्षेत्रावरचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. निकृष्ट दर्जाच्या बियाणे विकणाºया संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.
शेतकºयांना मदतीचा मुद्दाही ऐरणीवरकाबाडकष्ट करून तसेच कर्ज काढून सोयाबीती पेरणी केली. मात्र बियाणे उगवलेच नसल्याने ८ गावातील १५ शेतकºयांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे कृषी विभाग शेतकºयांना आर्थिक मदत मिळवून देणार की केवळ कागदोपत्री घोडे नाचवणार, हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे.
शेतकरी नेत्यांची चुप्पीबोगस सोयाबीन बियाण्यांच्या मुद्द्यावर शेतकºयांचे आंदोलन करून मोठे झालेले काही शेतकरी नेत्यांनी याप्रकरणात चुप्पी साधली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांचा कुणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.तालुक्यातील प्राप्त तक्रारीनुसार पंचनामे केले जात आहेत. त्यापैकी काही सोयाबीन बियाण्यांची उगम क्षमता १० ते १५ टक्के असल्याचे प्राथमिक चौकशीअंती दिसून आले. तसा अहवालही उपविभागीय अधिकाºयांना देण्यात आला आहे.-अमोल बनसोडेतालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर