"तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला" असे आपण मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सहजतेने बोलून जातो. पण त्याचा नेमका अर्थ शोधायचा प्रयत्न केला असता सामाजिक आरोग्य चांगले रहावे, सद्विचाराची पेरणी व्हावी, हा दृष्टीकोण त्यामागे असल्याचे नांदुरा येथील गुरुदेव सेवाश्रमातील आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी म्हणाले. या माध्यातून चांगले विचार पेरण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये हा सण साजरा केला जातो. समाजामध्ये आज होणार्या तंट्यांचा विचार करता ८५ टक्के वाद हे केवळ बोलण्यामुळे होत आहे. ते होऊ नये म्हणून चांगले बोलणे व चांगले वागण्याचा आपल्यावर संस्कार व्हावा, ही भूमिका या मागे आहे. कौटुंबिकस्तरावर मुले, आईवडील यांच्यात संवाद होत नसल्याचे दिसते. हा संवाद व्हावा व तो चांगला व्हावा. तो सुसंवाद सुरू झाल्यास कुटुंबासोबतच सामाजिक संवादही चांगला होऊन संस्कारक्षम समाज निर्मिती होईल. त्यासाठीच संस्कृत भाषेतील ह्यसत्यं वद; प्रियंं वदह्ण हे वाक्य आहे. भगवद्गीता, ग्रामगिता, ज्ञानेश्वरीमध्येही त्या अर्थाने लिखान झालेले आहे. संस्काराला महत्त्व दिल्या गेले. त्यामुळे ह्यखर बोला, गोड बोला व सत्य बोलाह्ण असे अभिप्रेत आहे.
सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही.
सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.सत्य बोला पण ते गोड बोला. सत्य कटू पद्धतीने सांगितल्यास पचत नाही. त्यामुळे ते सांगण्यासाठी गोड बोला. अनेक जण गोड बोलतात परंतू त्यातून असत्य कथन करता. त्यामुळे गोड बोला पण सत्य बोला.