बुलडाणा : जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या निदेर्शानुसार मतदारयाद्यांची विशेष मोहिम १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणारआहे. सामान्य नागरिकांनी मतदार यादीत नाव कसे नोंदवावे याबाबतकर्मचाºयांनी प्रशिक्षीत व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांतपुलकुंडवार यांनी दिल्या आहे.जिल्हा नियोजन समिती सभागृहात ९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वगार्चे आयोजनकरण्यात येते. या प्रशिक्षण वर्गामध्ये जिल्हाधिकारी मार्गदर्शन करतानाबोलत होते. यावेळी प्रशिक्षक म्हणून परभणी येथील उपजिल्हा निवडणूकअधिकारी बिबे, औरंगाबाद येथील तांत्रिक कर्मचारी मोमीन आदी उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षकांनी संबोधीत केले. ते म्हणाले,जिल्ह्यात १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बीएलओ यांनी घरोघरी जावूनमतदारासंबधी व नव्याने समाविष्ठ होणारे मतदार यांची नमुना १ ते ८ चीमाहिती संकलित करावी. तसेच आॅनलाईन मोबाईल अॅप अपलोड करावी. याप्रशिक्षण वगार्ला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पर्यवेक्षक,निवडणूक लिपीक, बीएलओ, डाटा एंन्ट्री आॅपरेटर उपस्थित होते. प्रशिक्षणवर्गाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले.प्रशिक्षण वर्ग यशस्वी करण्यासाठी रविंद्र काकडे, शत्रुघ्न चव्हाण, विजयसनिसे, अमोल वानखडे, विजय तायडे यांनी परिश्रम घेतले.
बुलडाणा जिल्ह्यात १५ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांची विशेष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 2:32 PM
बुलडाणा : जिल्ह्यात मुख्य निवडणूक अधिकाºयांच्या निदेर्शानुसार मतदार याद्यांची विशेष मोहिम १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे ९ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण वगार्चे आयोजन