लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यातंर्गत १७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील हागणदारी मुक्त झालेल्या ग्राम पंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राखण्यासाठी, तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय उपलब्धता, सार्वजनिक शौचालयची उपलब्धता व निधीचे वाटप, शाळा व अंगणवाडीमध्ये शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष देण्यात येणार आहे. सोबतच शौचालयाचा वापर होण्याच्या दृष्टीकोणातून जनजागृती करण्यात येणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दुसरा टप्पा अंतर्गत १९नोव्हेंबरला जागतिक शौचालय दिनाचे अैाचित्य साधून हे उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शौचालयांना वीज जोडणी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालय परिसरात स्वच्छता करणे, कुटुंबस्तरावर शौचालयाच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभीकरण, नादुरुस्त सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 12:44 PM