लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेची खास सभा बुधवारी आयोजित करण्यात आली. या सभेची टिप्पणी न मिळाल्याने, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकला. यावेळी सभागृहाबाहेर विरोधी नगरसेवकांनी तीव्र घोषणाबाजीही केली.शहरातील विविध विकास कामांना मान्यता देण्यासाठी खामगाव नगर पालिकेची खास सभा बुधवारी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली. या सभेच्या विषय सूचीचे १ जुलै रोजी वितरण करण्यात आले. मात्र, सभेच्या वेळेपर्यंतही विरोधी नगरसेवकांना टिप्पणी देण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत, सभेतून बर्हिंगमन केले. यावेळी विरोधी पक्ष नेत्या सौ. अर्चना टाले, नगरसेवक अमय सानंदा, अलकादेवी सानंदा, प्रवीण कदम, सरस्वती खासणे, मो. इब्राहिम, शितल माळवंदे, नगरसेविका सौ. पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश होता.