- नीलेश जाेशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्यातील अवैध चराईला प्रतिबंध घालण्यासाठी तथा वन्य जीव कर्मचाऱ्यांवर होणारे प्राणघातक हल्ले रोखण्यासाठी मेळघाताली विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करण्यात आले आहे. २७ सदस्यांच्या या पथकाडे चार एलएलआर रायफल ही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गुगामल आणि अकोट वन्यजीव विभागातून अतिरिक्त कुमक बोलवून हे दल अधिक सक्षम करण्यात आले आहे.ज्ञानगंगा अभयारण्यासह लगतच्या प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत अलिकडील काळात वन कर्मचाऱ्यांवर अवैध चराई करणाऱ्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानगंगा अभयारण्यात या लोकांना प्रतिबंध करण्यासोबतच वन कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीकोणातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. यासाेबतच वन कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखणे, अवैध चराई रोखणे हे प्रमुख उद्देश हे दल तैनात करण्यामागे आहे. दरम्यान अभयारण्याच्या परिसरात अवैधरित्या गुरांची चराई करण्यास प्रतिबंध व्हावा या दृष्टीकोणातून परिसरातील सर्व ग्रामपंचायत, गुरांचे मालक, गुराखी यांना अवगत करण्यात आले आहे. अवैध चराईचे प्रकार होत असल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशा स्वरुपाच्या सुचनाही दिल्या गेल्या आहेत. यासोबतच अवैध चराईचा बिमोड करण्यासाठी खामगाव वन्यजीव व वनपरीक्षेत्र अधिकारी एम. व्ही. धंदर तथा वन्यजीवचे वनपरीक्षेत्र अधिकारी डी. सी. लोखंडे यांनीही अशा व्यक्तींवर कारवाई करून या अवैध चराईस लगाम लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शस्त्रे देऊन या दलाची ताकद वाढविण्यात आली आहे.क
अवैध चराई प्रतिबंधासाठी ‘ज्ञानगंगा’त आता विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 12:22 PM