शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बुलेट ट्रेनचा डीपीआर बनविण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:23 AM

बुलडाणा : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भाने मध्यंतरी झालेल्या लीडार सर्वेक्षणानंतर आता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट ...

बुलडाणा : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसंदर्भाने मध्यंतरी झालेल्या लीडार सर्वेक्षणानंतर आता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) अर्थात विस्तृत प्रकल्प अहवाल बनविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासंदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयात २२ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. देशातील सात प्रस्तावित बुलेट ट्रेनच्या मार्गापैकी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन हा एक महत्त्वाचा तथा ७५३ किमी लांबीचा हा मार्ग आहे. जीपीएस टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील ५३ गावांमधून हा मार्ग प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले होते. त्याच्या आधारावर आता सार्वजनिक सुनावणीच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर पर्यावरण आणि सामाजिक स्तरावर पडणाऱ्या प्रभावाचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात २२ जुलै रोजी ही बैठक होत आहे. थोडक्यात मुंबई-नागपूर हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर (एचएसआर) विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यानुषंगाने हा कॉरिडॉर विकसित करण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्याच्या संदर्भाने जीपीएस टेक्नॉलॉजी सध्या काम करत आहेत. त्यानुषंगाने पर्यावरण व सामाजिक मूल्यांकनाचा अभ्यास करण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे.

२२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या यासंदर्भातील बैठकीत संभाव्य मार्ग, स्थानक पर्यावरण आणि सामाजिक स्तरावर याचे काय फायदे, तोटे होतील यासंदर्भाने हा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजीचे तीन सदस्यीय पथकही बुलडाण्यात २० जुलै रोजीच दाखल झालेले आहे.

--प्रस्ताविक मार्ग ‘समृद्धी’लगत--

मुंबई-नागपूर हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर समृद्धी महामार्गाला समांतर नेण्याचे तूर्तास प्रस्तावित आहे. प्रसंगी पर्यावरणीय व सामाजिक मूल्यांकनानंतर यात बदलही होऊ शकतो. मात्र तूर्तास बुलडाणा जिल्ह्यातील साधारणत: ५३ गावांजवळून हा मार्ग प्रस्तावित आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील बेलगाव, गोहेगाव, डोणगाव, आंध्रूड, अंजनी बुद्रुक, शहापूर, पिंप्री माळी, साब्रा, फैजपूर, गवंढाळा, कल्याणा, मेहकर, बरटाळा, शिवपुरी, पारडा, काळेगाव,, कुंबेफळ, वर्दडी खुर्द, दुसरबीड, राहेरी खुर्द, किनगाव राजा, शेलगाव राऊत, पळसखेड चक्का, पळसखेड मलकदेव, तुळजापूर, गोळेगाव, सावरगाव माळ यासह अन्य काही गावांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

--जागतिक बँकेचे अर्थसाहाय्य--

जागतिक बँकेच्या साहाय्याने हा हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यावरणीय व सामाजिक मूल्यांकनासंदर्भाने अभ्यास झाल्यानंतर या प्रकल्पाचा विस्तृत अहवाल बनविण्यात येऊन तो जागतिक बँकेला सादर केला जाईल. त्या आधारावर या मार्गाची आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय वस्तुस्थिती विचारात घेऊन पुढील बाबी निश्चित केल्या जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.