मेहकर : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने बसला धडक दिल्याने २४ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना समृद्धी महामार्गावरील फर्दापूरजवळील इंटरचेजजवळ २४ मार्च राेजी दुपारी घडली.
मेहकर आगाराची मानव विकास मिशनची बस क्र. एमएच १४ बीटी ४५४३ ही प्रवासी घेऊन शेगाववरून मेहकरकडे जात हाेती. दरम्यान समृद्धी महामार्गावरील फर्दापूरजवळील इंटरचेंजवर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या अज्ञात टिप्परने बसला जबर धडक दिली. या अपघातात बसमधील २४ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये प्रवीण सुभाष बोरकर (रा. हिवरा खुर्द), परसराम अर्जुन देऊळकर (रा. ब्रह्मपुरी), रामेश्वर त्र्यंबक हिवरकर, मदन उत्तम गाडे, सीताराम जानकीराम दळवी (सर्व रा. हिवरा खुर्द), रवीना राजू घायाळ (रा. मुंडेफळ) नामदेव दशरथ फलाने (रा. जानेफळ), वाल्मीक राजाराम मुरडकर (रा. जानेफळ), यश भगवान इंगळे (रा. अमडापूर), अश्रू वामन बोरकर (रा. हिवरा खुर्द), विठोबा मासाजी गायकवाड (रा. हिवरा खुर्द), सतीश विठोबा गायकवाड (रा. हिवरा खुर्द), पुंजाजी रंगनाथ बोरकर (रा. हिवरा खुर्द), माधव अमृता नाळगे (रा. इसोली), रत्नकला विष्णू काळे (रा. डोणगाव), श्रावणी राजू जाधव (रा. पिंपरखेड), पांडुरंग शंकर भोलनकर (रा. पिंपरखेड, विमल विठोबा गायकवाड (रा. हिवरा खुर्द), रुक्मिणा भीमराव अवसरमोल (रा. घाटनांद्र), किरण राजू जाधव (रा़ पिंपरखेड), रामेश्वर सखाराम भोपळे (रा. हिवरा खुर्द), मनोज सिंग देवसिंग राठोड (रा. विठ्ठलवाडी), सिद्धार्थ संतोष वानखेडे (रा. गोंडाळा), सुमनबाई मानसिंग राठोड (रा. विठ्ठलवाडी) आदींचा समावेश आहे.
जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ़ प्रताप जामकर व नीलेश मेहेत्रे, एएनएम सविता चराटे यांनी उपचार केले. रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सागर कडभने यांनीही जखमींना रुग्णालयात पाेहचविण्यासाठी मदत केली.