- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : केवळ कोरोनाच नव्हेतर कोणत्याही आपत्ती आणि संकट काळात एकमेकांना साथ देणे, मदत करणं हीच शिकवण भारतीय संस्कृतीची आहे. या शिकवणुकीची जोपासना करण्यासाठी 'कला के संग' हे देशव्यापी मदत अभियान राबविण्यात येत आहे. उस्ताद उल्लारखा खॉ यांच्या शिष्य, आंतरराष्ट्रीय तबला वादक तथा पद्मश्री पं.अनुराधा पाल यांच्याशी साधलेला संवाद.
'कला के संग' या अभियानाबाबत विस्तृत काय सांगाल?
कोरोनामुळे जगात हाहाकार उडाला आहे. अनेकांच्या नोकरी गेल्यात. काहींचा रोजगार बुडाला. कलाक्षेत्राचीही वाईट अवस्था झाल्याचे पाहून कलेची सेवा करणाऱ्यांना मदत देण्यासाठी, त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी ह्यकला के संगह्ण अभियान सुरू केले. कलावंतासंह कलावंतांना साहाय्य करणाऱ्या परद्यामागील कलावतांनाही या अभियानातंर्गत मदत केली जात आहे.
'कला के संग' या अभियानातंर्गत किती कलावंताना मदत झाली?
ह्यकला के संगह्ण हे अभियान महाराष्ट्रासह देशातील विविध प्रमुख राज्यात राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आदिवासी आणि दुर्गम भागातील २७० पेक्षा अधिक कलावंत, वाद्यनिर्मिती करणारे कारागीर आणि त्यांच्या परिवाराला मदत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील तानपुरा निर्मितीसाठी प्रसिध्द असलेल्या सातारा जिल्ह्यातील मीरज, सांगली, गडचिरोली, बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आणि आसाम, त्रिपुरा, गुजरात, केरळ या राज्यातील कलावंतांनाही मदत करण्यात आली.
सेवेच्या या उपक्रमाची संकल्पना कशी सुचली ?
आईचे वडिल पद्मश्री एम.टी. व्यास यांनी ८० एकर जमिन दान दिली होती. गोरगरीब, आदिवासी यांच्यासाठी ४० शाळा उघडल्या. तेच आपले प्रेरणास्त्रोत आहेत. त्यानंतर वडील देवेंद्र पाल, आई डॉ.इला व्यास यांचीही प्रेरणा आहे. पती श्याम शर्मा यांचे सेवा कार्यात सदैव सहकार्य आहे.
कोरोना काळात तसेच इतर उपक्रमाबाबत काय सांगाल?
सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रा सेवारत असलेल्या मुलीला पर्दमश्री एम.टी.व्यास स्मृती संस्कृती सेवा पुरस्काराने गतवर्षीपासून सन्मानित केले जात आहे. १ लक्ष ११ हजार १११ रूपयांचा पुरस्कार किसान विकास पत्रात डिपॉझिट करून दिल्या जात आहे. मार्च महिन्यात ५१ हजाराचा निधी पंतप्रधान मदत निधीला दिलाय. ऑगस्ट महिन्यात आंतराष्ट्रीय दर्जाच्या २७ कलावंतांच्या सहभागात देशातील एकमेव चार दिवशीय ऑनलाइन फेस्टीवल घेतले.