शिबिराचे उद्घाटन बुलडाणा शहर पाेलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. प्रशांत काेठे हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून कला शाखेचे प्रमुख डाॅ. श्रीराम येरणकर, शासकीय रुग्णालयाच्या डाॅ. नागपुरे, एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी डाॅ. कांदे, डाॅ. वंदना काकडे, एनसीसीचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुबाेध चिंचाेले आदी मान्यवर उपस्थित हाेते. प्रास्ताविकात डाॅ. वंदना काकडे यांनी रक्तदान का गरजेचे आहे याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व पाेलीस भरतीविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ. काेठेे यांनी रक्तदान करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राेत्साहन दिले. कार्यक्रमाला प्रा. डाॅ. इंगळे, प्रा. डाॅ. अरविंद पाटील, प्रा. डाॅ. भरत जाव, प्रा.डाॅ. नामदेव ढाले, प्रा. अनिल काळे, डाॅ. साेनवलकर, डाॅ. राजश्री जानाेरकर, प्रा. आत्माराम राठाेड, प्रा. गजानन लाेहाेटे आदींसह एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित हाेते. यावेळी डाॅ. याेगेश पहुरकर, प्रा. आत्माराम राठाेड, गजानन सुसर आदींसह ३८ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमासाठी विशाल साेनाेने, राेहिनी लाेखंडे, गाैरंग पाठक, प्रीती दळवी, प्रेरणा खरात, वानखडे, बरडे, एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
जिजामाता महाविद्यालयात रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:27 AM