वरवट बकाल (जि.बुलढाणा) - भारत बंदचे आंदोलनाच्या आवाहनानुसार शनिवारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तथा राष्ट्रीय पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चा यांच्या माध्यमातून आयोजित आंदोलनाला वरवट बकाल येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बौद्ध धम्माचे बुद्धगया, नागपूर तसेच काशी मथुरा येथील बौद्ध विहार व स्तूप तत्काळ बौद्ध बांधवांच्या ताब्यात द्यावे, बौद्ध बांधवांवर वाढते अन्याय रोखण्यासाठी तसेच अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना तत्काळ अटक करावी, मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात घटनात्मक आरक्षण मिळावे, यासारख्या विविध मागण्यासाठी भारत बंद आंदोलन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तथा राष्ट्रीय पिछडा (ओबीसी) वर्ग मोर्चा यांच्यावतीने करण्यात आले. संग्रामपूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारत बंदमध्ये विविध सामाजिक तसेच राजकीय आणि धार्मिक संघटनांनी पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदविला.
आंदोलनात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका संयोजक जगदीश कोकाटे, सुजित बांगर, पंकज इंगळे, विजय वानखडे, पंकज शेगोकार, सिद्धार्थ तायडे, सचिन कोकाटे, नीलेश लहासे,अंकित भारसाकडे, सचिन इंगळे, रंजीत सपकाळ, रामदास भारसाकडे, दयावंत इंगळे, योगेश इंगळे, पंकज वानखडे, रामा भारसाकडे, गुणवंत बांगर, महेंद्र इंगळे, तौसिफ शेख, उदेभान दांडगे, नाना तायडे, अंकुश कोकाटे, संतोष भारसाकडे, तुषार अजणे, आदित्य कोकाटे, आनंदा बांगर, बाळू वानखडे व तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी झाले. तामगाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला.