पुणे बॉक्सिंग असोसिएशन या संघाला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. अंतिम लढतीच्या विविध वजन गटातील महाराष्ट्रातील १३ मुष्टियोध्दे बेल्लारी (कर्नाटक) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये मुंबई विभागाचे ५, पुणे जिल्ह्याचे ४, कोल्हापूर ३, जालना १ या मुष्टियोध्दांचा समावेश आहे. विविध वजन गटात या स्पर्धेची ७ सप्टेंबर रोजी अंतिम लढत झाली. सुपर हेवीवेट (९२ किलो) गटात पुण्याच्या रेनॉल्ड जोसेफ याने मुंबई उपनगराच्या अनिल सिंग यांचा पराभव करुन "उत्कृष्ट बॉक्सर किताब" पटकाविला. या सर्व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण, रौप्य, व कांस्य पदक देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र बॉक्सिंग असोशिएशनचे महासचिव डॉ.राकेश तिवारी यांनी संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत स्पर्धा यशस्वी करण्याचे योग्य नियोजन केले. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरतकुमार वावळ यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा बॉक्सिंग असो.चे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकर, उपाध्यक्ष नीलेश इंगळे, कोषाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष आंबेकर, सचिव राज सोळंकी, मदनराजे गायकवाड, मोहम्मद सुफीयान व त्यांच्या चमूने सहकार्य करून स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
स्पर्धेचा समारोप
यशस्वी खेळाडूंना मंगळवारी बक्षीस विरतणानंतर स्पर्धेचा समारोप करण्यात आला. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष जय कवळी यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या आयोजन कालावधीत खा. प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, राजेश ऐकडे, गोपीकिशन बाजोरीया, माजी आ. दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार राहुल बोंद्रे, सुकेश झवंर आदींनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढविला.