लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : पिकांतील तणावर नियंत्रण मिळविण्यासाठी फवारणी केलेल्या तणनाशक औषधांमुळे पिकेच करपल्याच्या घटना सध्या सर्वत्र घडत आहेत. याचा फटका चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील शेतकऱ्याला बसला असून या शेतकºयाने तणनाशक फवारल्यामुळे त्यांच्या पाच एकरावरील सोयाबीन व तुरीचे पीक करपले आहे.तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील शेतकरी रमेश ज्ञानबा कठाळे यांनी गावातीलच रामानंद कृषी केंद्रातून ८ जुलै रोजी साकेत नामक तणनाशक औषध विकत घेतले होते. ही औषधी त्यांनी ९ जुलै रोजी आपल्या पाच एकरामध्ये योग्य प्रमाण वापरून फवारली. परंतू या औषधीचा विपरीत परीणाम झाल्याने शेतकºयाचे ५ एकरातील सोयाबीन व तूर पीक करपले आहे. या शेतातील पिकाचे मुळ काळे पडत असून पिकाने माना टाकायला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत शेतकरी स्वप्नील कठाळे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आधिच त्रस्त आहे. त्यात सदरचे औषध फवारल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याने शेताचे स्थळ निरीक्षण व पंचनामा करण्यात यावा व तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.नुकतेच पेरलेले सोयाबीन, तूर पीक जळाल्याने शेतकºयासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दरम्यान, १५ जुलै रोजी उपविभागीय कृषी अधिकारी डांबरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जायभाये, तालुका कृषी अधिकारी शिंदे व संबंधीत अधिकारी यांनी या पिकाची पाहणी केली व सविस्तर पंचनामा केला.याबाबत उचित कारवाई करून योग्य न्याय देण्याचे आश्वासन उपविभागीय कृषी अधिकारी डाबरे व समितीने शेतकऱ्यांना दिले आहे. यावेळी रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, शिवसेना विभाग प्रमुख संतोष वाकडे, गणेश आंभोरे, स्वप्नील कठाळे, येवले, सोनुने यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते. (तालुका प्रतिनिधी)
तणनाशक फवारल्याने पाच एकरावरील पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 3:43 PM