पाच रुग्णांना सुटी
देऊळगाव राजा : येथील कोविड सेंटरमधील पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
आठवडी बाजार बंद, व्यापारी अडचणीत
बीबी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथील आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी व भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सर्वांनी नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसंतप्रभा काॅलेजमध्ये शिवजयंती साजरी
बुलडाणा : येथील वसंतप्रभा काॅलेज ऑफ नर्सिंग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली. यावेळी संचालक वसंतराव चिंचोले, प्राचार्य सुनिलकुमार चव्हाण, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ॲटो भाड्यात ५ रुपयांची वाढ
मोताळा : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे येथील ॲटो चालकांनी ॲटो भाड्यात पाच रुपयांनी वाढ केली आहे. १७ फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ करण्यात आली आहे. मोताळा फाटा ते आठवडी बाजार पूर्वी पाच रुपयेच लागत होते.
बेलगाव येथे रक्तदान शिबीर
डोणगाव : येथून जवळ असलेल्या बेलगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० युवकांनी रक्तदान केले. यावेळी सर्वांनी शिवरायांना अभिवादन केले.
आडगाव राजाला सुंदर गाव पुरस्कार
सिंदखेड राजा : तालुक्यातील आडगाव राजा ग्रामपंचायतला सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याहस्ते जिल्हा परिषदमध्ये आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
किराणा दुकानातील साहित्य लंपास
बुलडाणा : शहरातील काळवाघे काॅम्लेक्समधील एका किराणा दुकानातील साहित्य लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्रीदरम्यान घडली. नंदकिशोर वाकदकर यांच्या किरणा दुकानात ही चोरी झाली आहे. अनेक महागड्या वस्तू लंपास केल्या.
पिकांचे नुकसान, सर्वेचे निर्देश द्या- कायंदे
देऊळगाव राजा : अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पीक नुकसानाच्या सर्वे निर्देश द्यावे, अशी मागणी मनोज कायंदे यांनी केली आहे.
काेरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा संदेश
डोणगाव : येथील छत्रपती गृ्पच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मास्कचे वाटप करून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती केली. आठवडी बाजार परिसरात कार्यक्रम घेण्यात आला.