लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्थानिक शासकीय विश्राम गृहासमोर पाच नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास चिखली आगाराची बस व ट्रकमध्ये समोरासमोर धडक होवून अपघात घडला. यामध्ये ट्रक रस्त्यावरच उलटला. सोबतच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.खामगाव - जालना महामार्गावरील स्थानिक विश्रामगृहासमोरील टी पॉईंटवर हा अपघात घडला. चिखली आगाराची बस क्रमांक एमएच- ४०- ८२३० ही बस ईसरूळकडे प्रवासी घेवून निघाली होती तर विरूध्द दिशेने एमएच ४० ऐएम-११७८ क्रमांकाचा ट्रक चिखलीकडे येत असताना या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात ट्रक रस्त्यावर उलटला. या ्पघातात ट्रक चालक व मालक प्रदीप सुसर (रा. टाकरखेड हेलगा, ता.चिखली), बसचालक अझहर शेख रशीद पटेल (वय ५४) हे जखमी झाले आहेत. सुदैवाने बसमध्ये प्रवासी तुरळक होते. त्यामुळे प्रवाशांना फारसा मार लागला नाही. मात्र, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ही बाब समजताच घटनास्थळी दाखल झालेले नगरसेवक दत्ता सुसर, शैलेश डोणगावकर, चिखली आगाराचे चालक बद्री महाले, सचिन लोखंडे यांनी तातडीने जखमीना उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी बसचालकासह ट्रकचालकानेही परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
खामगाव - जालना महामार्गावर एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2020 12:18 PM
Buldhana Accident News खामगाव - जालना महामार्गावरील स्थानिक विश्रामगृहासमोरील टी पॉईंटवर हा अपघात घडला.
ठळक मुद्देयामध्ये ट्रक रस्त्यावरच उलटला दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.