लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ४३५ शेड्युल धावतात. या बसफेऱ्यांना दिवसाला जवळपास २२ लाख रुपयांचे इंधन लागत आहे. परंतू गत काही दिवसांपासून एसटी महामंडळाला डिझेल टंचाईचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे बºयाच वेळा प्रवाशी घेऊन गेलेल्या बसेसला परत बोलाविण्याची नामुष्की एसटी महामंडळावर ओढावत आहे.डिझेलची कमतरता, पैसे नसल्यामुळे तेल कंपन्यांचे राहिलेले देणे, कर्मचाऱ्यांची पगारकपात यासारख्या विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळ सध्या चर्चेत आहे. गत आठवड्यामध्ये नाशिक आगारामधील बससेवा डिझेलअभावी विस्कळीत झाली झाली होती. त्यामुळे एसटीच्या सुमारे १०० फेºया रद्द करण्यात आल्या होता. बसमध्ये भरण्यासाठी डिझेलच नसल्याने कर्मचाºयांना आगारात बसून रहावे लागले. नाशिकनंतर रत्नागिरीच्या एसटी आगरातही डिझेलअभावी २७० फेºया रद्द करण्याची वेळ महामंडळावर आली. त्यामध्ये ग्रामीण भागातील १३६ व शहरी भागातील १३४ बसफेºयांची चाके थांबली. नाशिक, रत्नागिरी पाठोपाठ आता डिझेल टंचाईचे हे लोण बुलडाणा जिल्ह्यातही पोहचले आहे.काही दिवसांपूर्वी मेहकर आगरातील बसफेºया डिझेलमुळे विस्कळीत झाल्या होता. १७ डिसेंबर रोजी डिझेलअभावी मधातून परत बोलावलेली बस चिखली तालुक्यातील उंद्री बसथांब्यावरच विद्यार्थ्यांनी अडविल्याने गोंधळ निर्माण झाला होता. ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात असलेली माटरगाव गेरूश्रीधर नगर येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बसने शहरात ये-जा करावी लागते.परंतू बुलडाणा आगाराकडून याभागातील बसेस बºयाच वेळा नियमित सोडल्या जात नाहीत. १९ डिसेंबरला दुपारी बुलडाणा-चिखली जाणारी (एम-एच-०७-सी-९२७३) बस अचानक बंद पडली होती. २१ डिसेंबरला चिखली-काटोडा-देऊळगाव राजा ही बसफेरी डिझेलअभावी रद्द करण्यात आली. सोबतच इतर बसफेºयांचे नियोजन कोलमडले आहे. महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.डिझेल कमतरतेमुळे एसटी महामंडळाकडून अनेक बसफेºया वारंवार रद्द करण्यात येत आहेत. लांब पल्ल्याच्या अनेक बसफेºयाही बंद करण्यात आलेल्या आहेत. याकडे लक्ष देऊन प्रवाशांना योग्य सुविधा देण्यात यावी.- शेख उस्मान,अध्यक्ष, प्रवाशी सेवा संघटना.
एसटी महामंडळाला डिझेल टंचाईचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 3:01 PM