लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शासनाने राज्य परिवहन महामंडळास माल वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात एसटीच्या निर्जुंतूक माल वाहतूकीला जिल्ह्यातून सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातून पहिली बस सोडण्यात आलेली आहे. या वाहतूकीसाठी आठ टन वजनाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. लॉकडाउनमध्ये अडची महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या बसेस बंद होत्या. त्यामुळे मोठे उत्पन्न एसटी महामंडळाचे बुडाले आहे. सध्या ५० टक्के भारमानानुसार बस वाहतूक सुरू आहे. उत्पन्नासाठी पर्यायी स्त्रोत म्हणून माल वाहतुकीच्या उत्पन्नाकडे महामंडळाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे माल वाहतूकीसाठी जिल्ह्यातील एसटी बसेसचा वापर सुरू झाला आहे. यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे माल वाहतुकीसंदर्भात नियोजन केले जात आहे. आयुर्मान पूर्ण केलेल्या प्रवासी बसच्या अंतर्गत रचनेत बदल करून प्रवासी वाहतूक करणाºया बसचा यासाठी वापर करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातून पहिली बस चिखली येथून सोडण्यात आली आहे. चिखली ते सातारा दहा टन सोयाबीन बियाणे व चिखली ते निरा दहा टन सोयाबीन बियाणे पाठवण्यात आले आहे. ३ मे रोजी पुन्हा पाच बस पाठविण्याचे नियोजन महामंडळाकडून पूर्ण झाल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनाही फायदाशेतकरी, व्यापारी, लघू व मोठे कारखानदार यांच्यासाठी कोरोनाच्या संकटात माल वाहतूकीसाठी जिल्ह्यात एसटी सज्ज झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनाही या मालवाहतूकीसाठी मोठी मदत होणार आहे. बुलडाणा विभागातून राज्यातील कोणत्याही ठिकाणी माल पोहचविता येणार आहे.
असे आहे भाडेएसटीची मालवाहतूक सेवा महाराष्ट्रभर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी प्रतिकिलोमिटर २८ रुपये व जीएसटी असे भाडे आकारण्यात येत आहे. वेळेवर वितरण, सुरक्षित माल वाहतूक असे ब्रीद या उपक्रमाचे आहे. तात्काळ आणि २४ तास महामंडळाकडून ही सेवा दिली जाणार आहे. बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.