हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावा
मेहकर: पावसाला सुरुवात होताच हुमणीचे प्रजनन वाढते. ते पुढे पिकासाठी घातक ठरतात. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रजननच होऊ नये, याकरिता प्रकाश सापळे लावणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी झाडाखाली सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गाचे काम प्रगतिपथावर
डोणगाव: नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक सहामधील काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ८७ किलोमीटर लांबीचे काम दोन पॅकेजमध्ये सुरू आहे. यामधील सहा क्रमांकाच्या पॅकेजमधील समृद्धी महामार्गाचे कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनामुळे वाढले ज्येष्ठांचे प्रश्न
बुलडाणा: एकमेव आधार असलेल्या मुलाचा कोराेनामुळे मृत्यू झाल्याने ज्येष्ठ नागरिक पालकांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो. शरीर थकलेले असल्याने उपचारासाठी दवाखान्यात कसे जाणार, औषध आणण्यासाठी कोणाचा आधार घेणार, दैनंदिन गरजा भागविण्यासाठी धावपळ कशी करणार, अशा वेगवेगळ्या प्रश्नांचा सामना करण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकांवर आली आहे.
मेहकर पालिकेचे स्वच्छतेची कामे पूर्ण
मेहकर: नगर पालिकेने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केली आहेत. मेहकर नगर पालिकेकडे ७० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकाणी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेली आहेत. परंतू काही भागातील नाल्या घाणीने तुंबलेल्या दिसून येतात.
माॅर्निंगवाॅकला जाणाऱ्यांची संख्या वाढली
बुलडाणा : सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदान, फिरणे व सायकलिंग साठी सकाळी ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे माॅर्निंगवाॅकला जाणाऱ्यांची संख्या वाढली असून अनेकांकडून मास्क वापराकडे दुर्लक्ष होत आहे.