खामगाव : समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एस.टी. ट्रकवर आदळली तर पाठीमागून आलेला ट्रक एस.टी.ला धडकल्याने अपघात झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तरोडा शिवारात घडली. यवतमाळ आगाराची एमएच ४0 एन ९५१७ क्रमांकाची बस ही खामगाव येथून यवतमाळकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील तरोडा कसबा शिवारात समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. एस.टी.च्या चालकाने ओव्हरटेक करताना समोरुन वाहन आल्याने एस.टी. चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे एस.टी. समोरच्या ट्रकवर आदळली. तर पुन्हा बस रोडवर आणण्याच्या प्रयत्नात पाठिमागून येणार्या एमपी 0९ एचजी ८00८ क्रमांकाचा ट्रक एस.टी.वर धडकला. यामध्ये तिनही वाहनांचे नुकसान झाले. तर झालेल्या अपघातात एस.टी.तील सौ.किरण शिवलाल बघेकर, संतोष रामदास बघेकर रा. बाळापूर फैल व राजीयाबी शे.अजीज रा. पहुरजिरा हे तीन प्रवाशी जखमी झाले. झालेल्या अपघाताबाबत गोपालसिंग काळुसिंग चावडा वय ३0 रा. दुर्गा कॉलनी, हनुमान नगर उज्जैन यांनी ग्रामीण पोलिस स्टेशनला एस.टी. बस क्र. एम.एच. ४0 एन ९५१७ च्या बसचालकाविरुध्द निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिसांनी एस.टी. बसचालकाविरुध्द कलम २७९, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वेगात असलेल्या गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. तर काही ठिकाणी रस्त्ये खचल्याने लहान मोठे अपघात होत आहेत.
एसटी ट्रकवर आदळली
By admin | Published: July 12, 2014 10:14 PM