लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : अमडापूर प्रा.आ. केंद्रामार्फत जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेस परिसरातील गावांमध्ये ११ जुलैपासून सुरुवात करण्यात आली असून, भिंतीवर स्टिकर लावून ‘बेटी पढाओ’चा संदेश देण्यात येत आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी अमडापूर, मंगरुळ नवघरे, इसोली, कव्हळा, वरखेड या गावांमध्ये जाऊन मार्गदर्शन केले. यावेळी जि.प.सदस्य शैला पठाडे, पं.स.सदस्य शमशाद परविन शाहेद पटेल, जि.प.सदस्य गोदावरी धमक, सरपंच ललिता माळोदे, सरपंच रंजना मगर, ए.डी.काकडे, ठाणेदार भूषण गावंडे, एस.ई.हमेले, देशमुख, ज्योती चांगाडे, रेणुका सोळंकी यांच्यासह पात्र जोडपे व प्रा.आ.केंद्राचे सर्व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये भाग घेऊन परिश्रम घेतले.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेस सुरुवात
By admin | Published: July 14, 2017 11:49 PM