बेघर, निराधारांच्या सर्वेक्षणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 5:15 PM
बेघर, निराधारांच्या सर्वेक्षणास प्रारंभ झाला आहे.
खारमगाव: रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात सर्वेक्षण लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहरातील बेघर आणि निराधारांना निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खामगाव शहरातील बेघर आणि निराधारांच्या सर्वेक्षणास मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली. खामगाव नगर पालिका आणि ‘व्हीमॅक्स’ सोल्युशन प्रा. लिमिटेडच्यावतीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. मंगळवारी दुपारी बुलडाणा येथील व्हीमॅक्स सोल्युशन प्रा. लि.चे पर्यवेक्षक रोहित सूर्यवंशी, अभिजीत निकम खामगाव शहरात दाखल झाले. शहरातील विविध भागांचे स्थळ निरिक्षण करण्यात आल्यानंतर खामगाव नगर पालिकेचे शहर अभियान व्यवस्थापक राजेश झनके, निलेश पारस्कर, भागवत सुतवने यांच्या उपस्थितीत शहराच्या विविध भागातील बेघर आणि निराधारांचे सर्वेक्षण करण्यात आले. सायंकाळी नगर पालिका आवारालगत असलेल्या तसेच बस स्थानक आणि रेल्वे स्थानकालगत असलेल्यांची माहिती संकलित करण्यात आली. खामगाव शहरातील फुटपाथ, रेल्वे स्थानक अथवा बस स्थानक परिसरातील बेघर आणि निराधारांना ्रशासनाकडून संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण करण्यात येत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियानाचे शहर प्रकल्प अधिकारी म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोनदिवसीय सर्वेक्षणाला सुरूवात झाली. बुधवारी रात्री सर्वेक्षण पूर्णत्वास आल्यानंतर अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात येणार आहे. चौकट... विविध वस्त्यांमध्येही होणार सर्वेक्षण! ्नबसस्थानक, रेल्वे स्थानक, नगर पालिका परिसर आणि गर्दीच्या ठिकाणांसह शहरातील विविध वस्त्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येईल. बेघर आणि निराधारांची माहिती संकलित केल्यानंतर त्यांना निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे समजते. कोट... दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत बेघर आणि निराधारांचे सर्वेक्षणास मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकाºयांच्या मार्गदर्शनात सुरूवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी तसेच बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील सामाजिक संस्थांचेही सहकार्य लाभत आहे. - राजेश झनके शहर अभियान, व्यवस्थापक दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय उपजिविका अभियान, खामगाव.