जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड सेंटर वाढविण्यावर भर दिला जात आहे. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयात ५० बेडचे ऑक्सिजनचे काम पूर्ण झालेले आहे. ५० क्वारंटाईन बेडचे काम पूर्ण झालेले आहे. संपूर्ण स्टाफची नेमणूक याठिकाणी झालेली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हे हॉस्पिटल सुरू होऊन या भागातील रुग्णांना विनामूल्य सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे जिल्हा परिषद सर्कल देऊळगाव माळीच्या सर्व नागरिकांना सुविधा उपलब्ध होईल.
जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांनी वेळोवेळी पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. हे कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर या परिसरातील गोरगरिबांना विनामूल्य अशी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे.