शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

बुलडाणा जिल्ह्यात नवनगराच्या कामांना लवकरच प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 2:03 PM

बुलडाणा: नागपूर-मुंबई या दहा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन ठिकाणी नवनगर उभारण्यात येणार आहे.

- नीलेश जोशी बुलडाणा: नागपूर-मुंबई या दहा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन ठिकाणी नवनगर उभारण्यात येणार असून या स्मार्ट सिटीच्या कामास येत्या १५ दिवसात प्रारंभ करण्याचे दोन जानेवारी रोजी झालेल्या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठकीत एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी सुचीत केले आहे.दोन जानेवारीला समृद्धी महामार्ग जात असलेल्या दहाही जिल्ह्यातील एमएसआरडीसी, समृद्धी महामार्गाचे काम महसूल विभागातील अधिकारी यांची मुंबईतील बांद्रा येथे असलेल्या कार्यालयात सायंकाळी ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवारही प्रामुख्याने उपस्थित होते. त्यामध्ये संपूर्ण कामाचा आढावा घेण्यात येऊन भूसंपादनाची रखडलेली उर्वरित प्रकरणे त्वरेने निकाली काढण्यासोबतच नवनगर निर्माणाच्या दृष्टीने १५ दिवसात कामाला प्रारंभ करण्याबाबत सुचित करण्यात आले. या बैठकीस दहा ही जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम करणारे १३ ही कंत्राटदार उपस्थित होते.बुलडाणा जिल्ह्यात दोन नवनगर प्रस्तावीत असून त्यातील एक नवनगर हे मेहकर तालुक्यातील साब्रा, काब्रा, फैजलपूर परिसरात आणि दुसरे सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड, गोळेगाव येथे होणार आहे. या नवनगरासाठी प्रती नवनगर जवळपास ५०० हेक्टर जमिनीची गरज पडणार आहे. त्यानुषंगाने या भागातील जागेचे मॅपींग, सातबारा तपासणे, शेतकर्यांचे संमतीपत्र घेणे ही कामे करण्यात येऊन संपूर्ण नगराच्या सीमाक्षेत्राची आखणी करण्याचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षात या कामाला आता वेग येणार आहे. ही कामे येत्या १५ दिवसात सुरू करावी लागणार असली तरी संपूर्ण नवनगराचे काम मार्गी लागण्यास जवळपास एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १००७ हेक्टर क्षेत्र संपादीत झालेले असून खासगी भूसंपदान १२७ हेक्टर आहे. तेही वेगाने संपादीत करण्याचे काम चालू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चार तालुक्यात समृद्धी महामार्ग ८७ किमी २९० मिटर गेलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यात या मार्गासाठी लागणार्या जमिनीपैकी ९२ टक्के जमीन संपादीत करण्यात आली आहे. उर्वरित आठ टक्के जमीनही वेगाने संपादनाची हालचाल सुरू आहे. ही कामेही येत्या १५ दिवसात पूर्णत्वास नेण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मधुसूदन खडसे यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.

वनजमीन संपादनाचा फेज एक पूर्णसमृद्धी महामार्गासाठी २८.३० हेक्टर वनजमीन संपादीत करावयाची आहे. ती संपादन करण्याच्या प्रक्रियेचा फेज एक पूर्ण झाला असून दुसर्या फेजचे कामही आता अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती समृद्धी महामार्गावर काम करणारे अधिकारी दिनेश गिते यांनी ‘लोकमत’शी बोलताा दिली.सावरगाव माळ नवनगर कामास प्रथम प्रारंभसिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील नवनगराच्या मॅपींगसह अन्य कामास प्रथम प्रारंभ करण्यात येणार आहे. ५०० हेक्टरवर हे नवनगर अर्थात कृषी समृद्धी केंद्र राहणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, शाळा, महाविद्यालये, कोल्ड स्टोअरेज अशा सुविधा राहणार आहेत. जालना येथील ड्रायपोर्टच्या जवळच हे नवनगर असल्याने या नवनगराला नजीकच्या काळात चांगलेच महत्त्व येणार आहे. कृषी क्षेत्रातील नाशवंत माल येथे ठेवण्याचीही सुविधा पुढील काळात उपलब्ध होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाMehkarमेहकरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग