लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या पावनस्पर्शाने पुणित झालेल्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दारू हद्दपार करण्यासाठी गावपातळीवर सुरू असलेल्या लढयाला व्यापक स्वरूप देत हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने महात्मा गांधी जयंतीदीनी २ आॅक्टोंबर रोजी संपुर्ण जिल्हाभर विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संघटना, संस्था आणि दारूबंदीसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्त्यांकडून ‘मशाल मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे़ दारूमुक्तीसाठी सुरू झालेल्या या अभियानास २ आॅक्टोंबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून मशाल मार्चच्या रूपाने अभियान प्रारंभ होते आहे़ या अभियाना अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक तालुका व गाव पातळीवर दारूबंदीसाठी परीश्रम घेणाºया रणरागींनीसोबतच सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी तालुका स्तरीय मशाल मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा दारूमुक्तीचा हा निर्धार करण्यात येणार आहे. याअंतर्गत बुलडाणा येथे सायंकाळी ७ वाजता जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी पुतळयापासून मशाल मार्चला प्रारंभ होणार असून हा मार्च हुतात्मा गोरे स्मारकापर्यंत पदाक्रमण करणार आहे. तर चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापासून सायंकाळी ६ वाजता या मशाल मार्चला प्रारंभ होणार आहे़ वरील दोन्ही ठिकाणी दारूमुक्ती निर्धार परिषदेचे मुख्य संयोजक आमदार राहुल बोंद्रे, हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.वृषाली बोंद्रे यांचेसह मान्यवर सहभागी होणार आहे़ या मशाल मोर्चात प्रत्येक तालुक्यातील काढण्यात येवून गावा गावातील कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन दारूमुक्ती निर्धार परिषदेच्या संयोजक नरेंद्र लांजेवार, प्रेमलता सोनुने, रणजित राजपुत, गणेश वानखेडे, सुनिता भांड, राजेंद्र वानखेडे, ज्योती ढोकणे, पंजाबराव गायकवाड, मंजितसिंग शिख, हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या ज्योती बियाणी, शोभा सवडतकर, विद्या देशमाने यांनी केले आहे.
दारूमुक्त मातृतिर्थ जिल्ह्याच्या निर्धार अभियानास आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 8:37 PM
चिखली : राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या पावनस्पर्शाने पुणित झालेल्या मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातून दारू हद्दपार करण्यासाठी गावपातळीवर सुरू असलेल्या लढयाला व्यापक स्वरूप देत हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या पुढाकाराने महात्मा गांधी जयंतीदीनी २ आॅक्टोंबर रोजी संपुर्ण जिल्हाभर विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाºया संघटना, संस्था आणि दारूबंदीसाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्त्यांकडून ‘मशाल मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे़
ठळक मुद्देसंपूर्ण दारूबंदीसाठी निघणार ‘मशाल मार्च’हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणचा पुढाकार