बुलडाणा : दिवसेंदिवस कमी होत चाललेला मुलींचा जन्मदर हा चिंतेचा विषय असून, देशातील १00 जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर अत्यंत कमी झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १0 जिल्ह्यांचा समावेश असून, बुलडाणा जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. मुलींच्या या जन्मदरात वाढ व्हावी, यासाठी ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण हे अभियान सुरू करण्यात आले असून, या अभियानासाठी केंद्र सरकारने राज्याला २ कोटी ४0 लाख ७३ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयामार्फत पहिल्या हप्त्याचा ५0 टक्के निधी राज्यातील १0 जिल्ह्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलगी हे परक्याचे धन, मुलगी जन्माला आली म्हणजे हुंड्याचा भार, असे अनेक गैरसमज मुलींबाबत निर्माण होऊन, त्या जन्माआधीच गर्भात मारल्या जात आहेत. सन २0११ च्या जनगणनेत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत अत्यंत कमी झाल्याचे निदर्शनास आले. देशातील १00 जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी झाला. यामध्ये महाराष्ट्रातील १0 जिल्ह्यांचा समावेश आहे. मुलींचे दरहजारी प्रमाण कमी होत चालल्यामुळे सामाजिक समतोल बिघडत चालला होता. २0११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बीड जिल्हा यामध्ये प्रथम क्रमांकावर होता. या जिल्ह्यात दरहजारी मुलींचे प्रमाण ८0७ एवढे होते. बुलडाणा जिल्हा चौथ्या क्रमांकावर होता. जिल्ह्यात मुलींचे प्रमाण दरहजारी ८५५ एवढे होते. मागील काळात शासन व विविध सामाजिक संघटनांनी मुलींच्या जन्मदर वाढीसाठी केलेल्या जनजागृतीच्या माध्यमातून हा जन्मदर आता ९00 च्या वर आला आहे. जनतेमध्ये अधिक जाणीव जागृती व्हावी व मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २0१४ पासून महाराष्ट्रातील १0 आणि देशातील १00 जिल्ह्यांमध्ये ह्यबेटी बचाओ, बेटी पढाओह्ण हे अभियान सुरू केले होते.; मात्र ते राबविण्यासाठी निधीची तरतूद केली नव्हती. शासनाने आता २ कोटी ४0 लाख रुपयांची तरतूद करून ५0 टक्के निधी वितरित करण्याच्या सूचना केल्या आहेत. हा निधी लवकरच प्राप्त होणार आहे.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’साठी राज्याला दोन कोटींचा निधी!
By admin | Published: February 01, 2016 2:25 AM