बुलडाणा, मोताळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलतांना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. बुलडाणा तालुक्यातील कोलवड शिवारात पैनगंगेच्या पुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी त्यांनी केली. तसेच पाडळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणीही कर शेतकऱ्यांशी संवादही साधला. त्यानंतर मोताळा तालुक्यातील रोहीणखेड, बोराखेडी, अंत्री, वडगांव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त भागात त्यांनी पाहणी केली. दरम्यान, या भागात अधिक नुकसान झाले आहे.
या पाहणी दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत केंद्रीय ग्राम समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, बुलडाणा बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार रूपेश खंडारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी डाबरे, तालुका कृषि अधिकारी मेरत उपस्थित होते.
याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शासन सर्वोतपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी गणेश देशमुख, तहसीलदार सोनावणे व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी यांच्याकडूनही त्यांनी सविस्तर माहिती घेतली.