अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य विष्णुपंत पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. अल्लाबक्ष तांबोळी हाेते , तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. प्रभू दवणे, डॉ. श्रीराम येरणकर आदी उपस्थित हाेते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाठे यांनी केले.
प्रा. डॉ. श्रीराम येरणकर यांनी, कोरोना विषाणूचा उगम चीनमधील वूहान शहरामधून होऊन पूर्ण जगात पसरला. यामुळे प्रत्येक राष्ट्राची अर्थव्यवस्था व सामाजिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचे आणि याकरिता प्रशासन मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे सांगितले. पाच राज्यांतील निवडणुका, कुंभमेळा, शासनाने घालून दिलेले प्रतिबंध तोडून होणारे विवाह व समारंभातील मोठ्या प्रमाणात लोकांचा असलेला सहभाग यामुळे मोठया प्रमाणावर या विषाणूचा प्रसार झाला, असेही ते म्हणाले.
यावेळी जी. एस. महाविद्यालय, खामगाव येथील प्रा. डॉ. प्रफुल्ल अजमिरे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. संचालन प्रा. विलास टाले यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. आरती खडतकर यांनी मानले़