शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

बुलडाण्यात राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 6:41 PM

बुलडाणा : संयमी, सुसंस्कृत, निरहंकारी मूल्याधिष्ठीत विद्यार्थी घडविण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देवद्वारा ११  आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुलडाणा : संयमी, सुसंस्कृत, निरहंकारी मूल्याधिष्ठीत विद्यार्थी घडविण्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचा देवद्वारा ११  आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. गोकुळ अष्टमी महापर्वानिमित्त आयोजित या परिक्षेमध्ये राज्यातील हजारो विद्यार्थी सहभाग घेणार आहेत.ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात संशोधनासाठी गीतेसारखा उपयुक्त असा दुसार ग्रंथच नाही. भारताची अखंडता, पवित्रता व सांस्कृतीक अभिवृद्धीसाठी या ग्रंथाचे समाज मुल्य आकलन होणे महत्त्वाचे आहे. श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने गोपाल आश्रमाच्या माध्यमातून आचार्य लोणारकर बाबा मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा घेण्यात येते.  यापूर्वी ही ज्ञान स्पर्धा श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे घेण्यात येत होती. त्यानंतर मागील काही वर्षांपासून बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील गोपाल आश्रमातील पंचकृष्ण मंदिर परिसरात घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी, तरुणांनी अध्यात्मासोबत विविध प्रकारचे ज्ञान आत्मसात केले आहे. ही परीक्षा देणाºया अभ्यासकास गीतेच्या माध्यमातून काम-क्रोधावर नियंत्रण ठेवून मन एकाग्र करता येते. तसेच ज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनासाठी या परीक्षेचा उपयोग होत आहे. या परीक्षेसाठी तसेच आश्रमातील विविध शिबिराच्या माध्यमातून आजही आचार्य श्री लोणारकर मोठे बाबा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सत्य, अहिंसा, आदरभाव, भूतदया, कार्यदक्षता, मानवता, श्रीमद् भगवद् गीता तत्त्वज्ञान, आरोग्य, ज्ञान-विज्ञान या विषयावर ज्ञान देण्यात येते. यावर्षी ११ आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा होणार आहे. ही परीक्षा मराठी माध्यमातून सुलभ मराठी सिद्धांतार्थ गीता ग्रंथावर सोप्या वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धेत सहभाग घेणाºया स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.  १ सप्टेंबरला बक्षीस वितरणअखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्रीक्षेत्र जाळीचादेव व्दारा बुलडाणा-अजिंठा रस्त्यावरील श्री गोपाल आश्रम येथे आयोजित  करण्यात आलेल्या राज्यस्तरीय श्रीमद् भगवद गीता ज्ञानस्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण १ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांबरोबच नागरिकांसाठी खुल्या स्वरूपाची आहे.  आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांचा सहभागमहानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेच्यावतीने गोपाल आश्रमाच्या माध्यमातून आचार्य लोणारकर बाबा मोठे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९३ पासून गोकूळ अष्टमीच्या महापर्वानिमित्त राज्यस्तरीय श्रीमद् भगवद् गीता ज्ञानस्पर्धा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत आतापर्यंत पाच लाखांपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला असून, दरवर्षी जवळपास २५ हजार स्पर्धक परीक्षेसाठी नोंदणी करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा