लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्यशासनाने शासकीय कार्यालयातील कामाचा साप्ताहिक कालावधी पाच दिवसांचा करतानाच दैनंदिन कामाच्या वेळेत ४५ मिनिटांनी वाढ केली आहे. परंतू सकाळी ९.४५ वाजता हजर राहण्याला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खो दिला. बुलडाण्यातील विविध शासकीय कार्यालातील कर्मचारी दुसºयादिवशीही लेट झाल्याचे वास्वत ३ मार्च रोजी ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले. त्यामुळे नवीन वेळ अंगवळणी पडणार केव्हा? असा प्रश्न उपस्थित होते आहे.कर्मचारी अधिकारी संघटनांच्या मागणीवरून राज्य सरकारने शासकीय कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या दिवशी अनेकांनी नवीन वेळ पाळली नाही; मात्र दुसºया दिवशीही तिच परिस्थती बुलडाणा येथील शासकीय कार्यालयांमध्ये दिसून आली. प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कार्यालय आहेत. त्यातील जवळपास सर्वच कार्यालयामधील कर्मचारी लेटलतीफ ठरले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क, सावर्जनिक बांधकाम विभाग याठिकाणीही अधिकारी कर्मचाºयांविना खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या. त्यानंतर लोमकमतची टीम सकाळी जिल्हा परिषदमध्ये पोहचली. त्याठिकाणी प्रत्येक कार्यालयात एखादा कर्मचारी हजर होता; तर काही कार्यालये बंदच मिळून आली. काही कार्यालयांमध्ये शिपाई आलेले होते; मात्र अधिकारी व कर्मचाºयांनी नवीन वेळ पाळली नाही. जिल्हा परिषदमधील शिपाई झाडलोट, स्वच्छता करून आपल्या वरिष्ठांची वाटप पाहत बसून होते. जिल्हाधिकारी कार्यालयात काही महिला कर्मचारी हळुहळू जुन्या वेळेवर येताना दिसले. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.
लाईट, फॅन सुरू मात्र अधिकारी गायबजिल्हा परिषद व प्रशासकीय भवनातील कार्यालयांमध्ये लाईट, फॅन सुरू होते. मात्र याठिकाणी अधिकारी, कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. त्यामयुळे शासकीय कार्यालयांमध्ये या वाढीव वेळेचा सदुपयोग न करता वीज जाळण्यासाठी पुर्णपणे झाल्याचा प्रकारा पाहावयास मिळाला.
वेळेवर आले अन् बाहेर चहा घेत बसलेकाही प्रामाणिक कर्मचारी वेळेवर आले; परंतू कार्यालयात न बसता बाहेरच चहा घेत बसले होते. त्यामुळे शिपाई कार्यालय उघडून बसलेले होते. आपले वरिष्ठ अधिकारीच आले नाहीत, त्यामुळे कर्मचाºयांनीही कामाला सुरूवात केली नसल्याचे दिसून आले.
१० वाजता शुकशुकाट९.४५ ची वेळ असतनाही शासकीय कार्यालयांमध्ये १० वाजता शुकशुकाट पहावयास मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य उत्पादन शुल्क याठिकाणी तर हद्दच झाली. या कार्यालयामध्ये एक ते दोन कर्मचारी वगळता कोणीही हजर नव्हते.