शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

Sting Operation :पाच दिवस उलटल्यानंतरही निरिक्षक परतले नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 1:42 PM

सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील दुपारपर्यंत वजने मापे कार्यालय बंद असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.

- अनिल गवई

खामगाव : स्थानिक वजने मापे कार्यालयाचा कारभार वारंवार चव्हाट्यावर येत असतानाच, बुधवारी तपासणीसाठी गेलेले निरिक्षक तब्बल पाच दिवसांपासून कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यामुळे लागोपाठ पाच दिवस या कार्यालयाला कुलूप होते. सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील दुपारपर्यंत वजने मापे कार्यालय बंद असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.

स्थानिक प्रशासकीय इमारतीत निरिक्षक वैध मापन शास्त्र (वजने मापे) कार्यालय आहे. मात्र, अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे हे कार्यालय नेहमीच वाºयावर असल्याचे दिसून येते.  मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात लागोपाठ तीन दिवस या कार्यालयाला कुलूप होते. त्यानंतर २७ मार्च ते ०१ एप्रिलच्या कालावधीत देखील या कार्यालयाला कार्यालयीन वेळेत कुलूप दिसून आले. २७ एप्रिल रोजी  तपासणी कामासाठी गेलेले निरिक्षक सोमवारी तब्बल पाच दिवसांपर्यंत पोहोचले नसल्याची चर्चा प्रशासकीय इमारतीत होत आहे. दरम्यान, निरिक्षक हे अकोला येथून नियमित ये-जा करीत असल्याने, कार्यालयातील कर्मचाºयांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येते. निरिक्षक तपासणी कामासाठी बाहेर आणि कार्यालयीन कर्मचारी अघोषित सुटीवर आणि कार्यालयाला कुलूप असेच चित्र या कार्यालयाचे नित्याचे झाल्याचे दिसून येते.

 

‘लोकमत’मुळे उघडले कुलूप!

-  २६ मार्च रोजी या कार्यालयाला कुलूप होते. त्यानंतर २७ मार्च रोजी देखील सकाळी ११$$:४५ वाजता हे कार्यालय कुलूप बंद होते. २८ मार्च रोजी देखील हा प्रकार कायम होता. दरम्यान, ‘कार्यालय बंद’ असल्याचे स्टिंग आॅपरेशन करण्यात आल्याचे समजताच २८ मार्च रोजी काही काळासाठी हे कार्यालय तात्पुरते उघडण्यात आले आणि ‘निरिक्षक, तपासणी कामासाठी एमआयडीसी’मध्ये गेल्याची चिठ्ठी चिटकविण्यात आली. 

 

असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!

- वजने मापे कार्यालय सतत कुलूप बंद राहत असल्याने, या कार्यालयाशी निगडीत असलेल्यांच्या तक्रारीवरून सोमवार २५ मार्चपासून या कार्यालयाची नियमित पाहणी करण्यात आली. यामध्ये २५ मार्च रोजी  दुपारी ३:३० वाजता कार्यालयीन वेळेत कार्यालय बंद होते. २६ मार्च रोजी देखील सकाळी हे कार्यालय बंद होते. त्यानंतर २७ मार्च रोजी देखील नित्याचाच प्रकार कायम होता. २८ मार्च रोजी कार्यालय उघडून फलक लावण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी आणि सोमवारी सकाळी देखील या कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले.

- नियमित तपासणीसाठी आपणास नियमित बाहेर जावे लागते. २७ मार्च रोजी एमआयडीसीत तपासणी कामासाठी गेलो होतो. सातत्याने कार्यालय बंद असल्याची माहिती घेतली जाईल.

-पी.पी. शेरेकर, निरिक्षक, वजने मापे, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगाव