लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यात काटेकोर प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी, खामगावात प्लास्टिक बंदीचे वाभाडे काढल्या जाताहेत. शहरातील प्लास्टिक विक्रेते राजरोजपणे कमी जाडीच्या पिशव्याची विक्री करीत असल्याने, बाजारात दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदीसाठी या पिशव्यांचा सर्रास वापर केल्या जात आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी केवळ नावालाच उरल्याचे चित्र ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये शुक्रवारी उघडकीस आले.प्लास्टिकमुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात अनेक वर्षापासून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे, पण आता राज्य शासनाने सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मोजक्या म्हणजे औषधी आणि अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंच्या प्लास्टिक पिशव्यांना यातून वगळण्यात आल्या तरी, पालिका प्रशासनाकडून पळवाट काढून कारवाई केली जात आहे. तर पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी प्लास्टिक विक्रेत्यांशी संपर्क साधून कारवाईची माहिती पुरवितात. त्यामुळे पालिकेच्या पथकाची धाड पडण्या अगोदरच प्लास्टिक विक्रेते सजग होतात. गतवेळी कारवाईची माहिती मिळाल्याने, एक प्लास्टिक साहित्याची विक्री करणारा विक्रेता दुकान बंद करून निघून गेला होता. त्यामुळे अकोला येथील अधिकाऱ्यांची धाड त्यावेळी फसली होती. त्यानंतर बºयाच दिवसांपासून प्लास्टिक बंदीची मोहिम थंडावली असून, प्लास्टिक पिशव्यांनी बाजारात डोके वर काढले आहे. यासंदर्भात पालिकेतील आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, नियमित कारवाई सुरू असल्याचे सांगितले. चोरून-लपून प्लास्टिकचा वापर सुरू असल्यास प्लास्टिक बंदीची मोहिम आणखी तीव्र केली जाईल, असे नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!शहरातील बाजारपेठेसह काही गृहपयोगी वस्तूंच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना भेटी दिल्या असता, चोरी-छुपे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून आले. भाजी, फळ विक्रेते आणि काही मास विक्रीच्या दुकानात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
‘गुप्त पथक’ नावालाच!शासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगर परिषद प्रशासनाने गतवर्षी एक गुप्त पथक गठीत केले होते. दस्तुरखुद्द मुख्याधिकाºयांच्या पुढाकारात हे पथक गठीत करण्यात आले होते. मात्र, या पथकात असलेल्या आरोग्य विभागातील एका अधिकाºयांनेच या गुप्त पथकाची ‘वाट’ लावल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
खामगावात प्लास्टिक बंदी वाºयावर!प्लास्टिक बंदी कारवाई मोहिम थंडावल्याने शहरात सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येते. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालूनही त्याचा वापर सुरूच असल्याने आता नव्याने प्लास्टिक बंदी करण्यात आल्याने प्लास्टिक बंदीचे हे गुºहाळ व्यावसायीकांसाठी नवे राहिले नसल्याचे दिसून येते.