लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: परिसरात काही दुकानदारांकडून मुदतबाह्य वस्तुंची विक्री करण्यात येत असल्याची परिस्थिती ‘लोकमत’ स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे.कोरोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत विविध वस्तुंची खरेदी करण्यासाठी ग्राहक लगबग करताना दिसून येत आहेत. गर्दी होऊ नये यासाठी दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सीग पाळण्यात येत आहे. लगबगीने सामान घरी घेवून जाताना खरेदी केलेली वस्तु मुदतबाह्य आहे किंवा नाही, याकडे ग्राहकांचे विशेष लक्ष राहत नसल्याचे दिसून येते. नेमक्या याच परिस्थितीचा फायदा काही दुकानदार घेत आहेत. दरम्यान मुदतबाह्य वस्तुंच्या वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देवून असे प्रकार रोखण्याची गरज आहे.गत काही दिवसांपासून या प्रकारात वाढ झाली आहे. अगदी वैद्यकीय आणि लहान मुलांच्या आरोग्याशी निगडीत वस्तूंचीही कालबाह्य विकल्या जात आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय वस्तूंची विक्री अतिशय नियमबाह्य पध्दतीने केली जात असल्याचे चित्र आहे. असे केले ‘स्टिंग’सध्या काही दुकानांमधून मुदतबाह्य वस्तुंची विक्री सुरू आहे, याची माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. यानंतर प्रतिनिधी स्वत: एका दुकानात ग्राहक बनून गेला असता मुदतबाह्य वस्तुंची विक्री होत असल्याचे दिसून आले.