लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या मोहिमेदरम्यान अनेक मतदार नोंदणी केंद्र बंद असल्याने विशेष मतदार नोंदणी मोहीमेची वाट बीएलओनी वाट लावल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून २३ व २४ फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत खामगाव मतदारसंघासह बुलडाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, शनिवारी मतदान केंद्रावर फिरकलेच नाहीत.हीच परिस्थिती दुस?्या दिवशीही कायम होती. त्यामुळे मतदार नोंदणीसाठी आलेल्या अनेक नवीन मतदारांना तसेच दुरुस्ती करण्यासाठी आलेल्या जुन्या मतदारांना आल्या पावली परतावे लागले. खामगाव शहरातील ७६ मतदार केंद्रासोबतच खामगाव मतदार संघातील ३१६ मतदार केंद्रांपैकी बहुतांश केंद्रावर अतिशय विदारक परिस्थिती दिसून आली. रविवारी नगरपालिके जवळील मतदान केंद्र ते दुपारी बारा वाजता बंद होते. तर त्याच वेळी पत्रकार भवनात असलेल्या मतदान केंद्राला सुद्धा होते. हीच परिस्थिती कॉलनीतील एका मतदान केंद्रावर दिसून आली. तसेच शहराच्या उर्वरित मतदान केंद्रावर देखील फिरकले नाहीत. त्यामुळे विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले.
विशेष मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत मतदान केंद्र बंद ठेवणा?्या बिलओची माहिती घेतल्या जाईल. दोषी आढळल्यास वरीष्ठ स्तरावर कारवाईचा प्रस्ताव सादर केला जाईल.-विजय चव्हाणनिवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार खामगाव.विशेष मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान रविवारी अनेक मतदान केंद्र बंद होते. हा धक्कादायक प्रकार असून वरिष्ठ अधिका?्यांची दिशाभूल करणा?्यावर कारवाई व्हावी.- तेजेंद्रसिंग चव्हाणजिल्हाध्यक्ष काँग्रेसबुलडाणा.