- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गोंदिया येथून करण्यात येणाºया ‘सीएमआर’(कस्टम मील राईस) तांदूळ वाहतुकीत नियमांची पायमल्ली केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. सीएमआर तांदूळ वाहतूक कंत्राट आदेशाला अवघे दहा दिवस लोटत नाही, तोच नियम डावलून धान्य उचल आणि वाहतूक करण्यात असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाली. हे येथे उल्लेखनिय!
बुलडाणा जिल्ह्याकरीता माहे मार्च २०१९ करीता अंत्योदय अन्न योजनेचा १३३० आणि प्राधान्य कुटुंब योजनेसाठी ३०३९ टन तांदूळाचे नियतन मंजूर करण्यात आले. त्यानुसार पणन हंगाम २०१८-१९ मध्ये आधारभूत किंमत योजनेतंर्गत प्राप्त झालेल्या धानापासून तयार (सीएमआर) तांदुळाची गोंदीया येथील एमआयडीसीच्या गोदामातून उचलकरून बुलडाणा जिल्ह्यातील विविध शासकीय गोदामात वाहतूक करण्यासाठी ४ फेब्रुवारी २०१९ रोजी आदेश देण्यात आहेत. मात्र, या आदेशाला जेमतेम दहा दिवस पूर्ण होत नाही, तोच सर्व अटी आणि शर्थीचा भंग करून तांदूळ वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी खामगाव येथील सरकारी गोदामात उघडकीस आला. यामध्ये हिरवा रंग नसलेल्या तसेच ‘सार्वजनिक वितरण प्रणाली’अंतर्गत धान्य वाहतूक असे ठळक अक्षरात लिहिलेले नसलेल्या वाहनातून तांदूळ उतरविण्यात आला. उल्लेखनिय म्हणजे, या वाहनाला जिल्हाधिकाºयांची मान्यताही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे सीएमआर तांदूळ वाहतूक अटी व शर्थीचा भंग करून केली जात असल्याचे अधोरेखीत होत आहे. परिणामी, जिल्ह्यात पुन्हा एकदा धान्य वाहतूक घोटाळ्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांच्याशी संपर्क केला असता, ते उपलब्ध होवू शकले नाहीत. तर जिल्हा प्रशासनातील एका अधिकाºयांनी याबाबत चौकशी करून कळविण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
‘लाल’रंगाच्या वाहतून उतरविले तांदूळ!
गोंदीया येथून एका लाल रंगाच्या वाहनातून तांदूळ आणण्यात आला. हा तांदूळ बुधवारी दुपारी खामगाव येथील शासकीय गोदामात उतरविण्यात आला. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने कॅमेराबध्द केला. त्यावेळी धान्य उतरविणाºया मजूरांची चांगलीच तारांबळ उडाली. चालकाने गोदामातून लागलीच वाहन काढण्याचा प्रयत्नही केला.
२०१७-१८ मध्ये ‘लोकमत’ने उघडकीस केला घोळ!
सीएमआर तांदूळ वाहतूक वाहनांच्या ‘टोल’ पावत्या गहाळचा मुद्दा ‘लोकमत’नेच सर्वप्रथम ऐरणीवर आणला होता. तसेच वाहतुकीच्या ‘ट्रान्सपोर्ट’पासचा घोळ ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्यामुळे वाहतूक कंत्राटदाराचा दोनवेळा रक्कम मिळविण्याचा प्रयत्न फसला होता. हे येथे उल्लेखनिय!
जिल्हा प्रशासनाकडून चौकशी!
शासन आदेशाची पायमल्ली करीत सीएमआर तांदूळाची वाहतूक झाल्याच्या प्रकाराबाबत माहिती मिळताच, जिल्हा प्रशासनाकडून लागलीच या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्यावेळी झालेल्या घोटाळ्यामुळे जिल्हाधिकाºयांनी बुधवारच्या प्रकाराला गांर्भीयतेने घेतल्याचे समजते.