लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: भ्रूणहत्येसोबतच गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱा अैाषधी साठा अन्न व अैाषध प्रशासन विभागाने जप्त केला असून बुलडाणा शहरातील एका मेडीकल स्टोअर्सममध्ये हा साठा आढळून आला. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील २० संशयीत मेडिकल स्टोअर्सची अन्न व अैाषध प्रशासन विभागाने तपासणी केली आहे. सोबतच ज्या विक्रीच्या व्यवहारांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. अशा सुमारे सहा जणांना अन्न व अैाषध प्रशासन विभागाने नोटीसही बजावली आहे.
आतापर्यंत कोरोनाच्या उद्रेकामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसह, आवश्यक अैाषधीसाठा, ऑक्सिजनसाठी पाठपुरावा करण्यात अन्न व अैाषध प्रशासन विभाग व्यस्त होता. त्यातच आता कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात नियंत्रणात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्न व अैाषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार एफडीएने एमटीपी ड्रग अर्थात गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या अैाषधी साठ्याच्या तपासणीची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत आजापर्यंत जिल्ह्यातील २० अैाषध विक्रेते व डॉर्क्टसच्या पेढ्यांची तपासणी अन्न व अैाषध प्रशासन विभागाने केली आहे. या तपासणीदरम्यान बुलडाण्यातील जांभरूण रोडवरील मे. मनिष मेडीकल ॲन्ड जनरल स्टोअर्समध्ये आक्षेपार्ह पद्धतीने एमटीपी ड्रग अंतर्गत गेसट्रॅप्रो टॅबलेटचा साठा आढळून आला. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या साठ्याच्या खरेदी-विक्रीच्या बिलासंदर्भात सध्या अन्न व अैाषध प्रशासन विभाग तपास करत आहेत. त्यानंतर यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे एफडीएचे सहाय्यक आयुक्त (अैाषधे) अशोक बर्डे यांनी स्पष्ट केले आहे. ही कारवाई अन्न व अैाषध प्रशासन विभागाचे (अैाषधे) सह आयुक्त यु. बी. घरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अशोक बर्डे, अैाषध निरीक्षक गजानन घिरके व सहकाऱ्यांनी केली. सध्या काही मेडिकल स्टोअर्सची तपासणी सुरू आहे.