धाड : वर्ग ४ शिक्षक दोन तेही कायम नसून मागील पाच वर्षापासून शिक्षण विभागाच्या हा भोंगळ कारभार सुरु आहे. अखेर बोरखेड धाड येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांंना शाळेत पाठविणेच बंद केले आहे. बुलडाणा तालुक्यातील बोरखेड धाड हय़ा येथे वर्ग १ ते ४ पर्यंंत शिक्षणाची व्यवस्था आहे. मागील पाच वर्षापासून येथील शाळेला कायम शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांंचे नुकसान होत आहे. यावर्षी शैक्षणिक सत्र सुरु होऊन तब्बल १५ दिवस लोटले तरी येथील शाळा सुरू झाली नाही.कायमस्वरुपी शिक्षक द्यावा यामागणीसाठी पालकांनी शाळेत विद्यार्थी पाठविणे बंद केले आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले.या निवेदनात म्हटले की, मराठी प्रा.शाळेस गेल्या ५ वर्षात कायम स्वरुपी शिक्षक दिले नाही. वेळोवेळी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक येथे दिल्या जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांंचे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील पालकांनी विद्यार्थी काढून घेतले आहे. सध्या वर्ग १ ते ४ पर्यंंत असणार्या शाळेस तात्पुरत्या स्वरुपात दिलेले शिक्षक काम पाहत आहे. ते केव्हाही बदलून जातात. यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा व ही समस्या मार्गी लावून येथे कायमस्वरुपी शिक्षक देण्यात यावे अन्यथा येथील समस्या सुटेपर्यंंत विद्यार्थींंना शाळेत न पाठवण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनावर तेजराव वाघ, संतोष खांडवे, रामदास खांडवे, गजानन राऊत, वासुदेव माळोदे, शंकर खांडवे, पंजाब बावस्कर, देवीदास जाधव यांचेसह असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत.
कायम स्वरुपी शिक्षका अभावी मुलांना शाळेत पाठवणे केले बंद !
By admin | Published: July 10, 2014 11:27 PM