चांडोळ : बुलडाणा तालुक्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या चांडोळ परिसरात गत काही दिवसांपासून अवैध धंदे माेठ्या प्रमाणात सुरू आहेत.
वरली, मटका, जुगार, वाळू तस्करी तसेच अवैधपणे विनापरवानाधारकांकडून दारू विक्री जोरात सुरू आहे. अवैध धंदे बंद करण्याची मागणी शिवसेना शाखाप्रमुख सुरेश धनावात यांनी केली आहे.
संचारबंदीच्या काळात मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्याने अनेक नागरिकांना पोटभर जेवणसुद्धा मिळत नाही तर दुसरीकडे अवैध धंदे करणारे लाखाे रुपयांची उलाढाल करीत आहेत. चांडाेळ येथील बसस्थानक परिसरात राजरोसपणे अवैध दारूविक्री सुरू आहे तसेच वरलीही सर्रास सुरू आहे. गावात वर्दळीच्या ठिकाणी दिवसभर जुगार खेळल्या जात आहे. वरलीचे आकडेसुद्धा घेतल्या जात आहे. त्यामुळे गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी शिवसेना शाखाप्रमुख सुरेश धनावत यांनी केली आहे.