बुलडाणा : महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते तथा माजी बांधकाम मंत्नी छगन भुजबळ यांना सोमवारी रात्नी सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ आज १५ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक महामार्गावरींल वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. आंदोलन करणार्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून नंतर सोडून देण्यात आले. या आंदोलनादरम्यान जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडली नाही.बुलडाणा येथील तहसील चौकात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डी.एस. लहाने यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करून तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. जवळपास अर्धा एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे मलकापूर, चिखली व खामगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला आहे. त्यानंतर तहसीलदार बाजड यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात तालुकाध्यक्ष दत्तात्नय लहाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. सुमित सरदार, शहराध्यक्ष दत्ता काकस, मनिष बोरकर, सावजी जाधव, गंजीधर गाढे, संतोष पाटील, नीलेश देठे, गजानन कोरके, कबीर बरडे, सत्तार कुरेशी, चंदु काकडे, सलीम बेग, उमेश अग्रवाल, रवी जैयस्वाल, युनूस खान, हाफीज, संजय उबरहंडे व संदीप सोनोने, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहन बाभुळकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी राष्ट्रवादीचा रास्ता रोको
By admin | Published: March 16, 2016 8:36 AM