अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले धान्याचे गाेदाम
बुलडाणा : तूर, उडीद व इतर माल खरेदी फक्त गोदाम उपलब्ध नसल्याने बंद झाल्याचे प्रकार जिल्ह्यात घडले आहेत, पण जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे गोदाम सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात व घाणीची सुरक्षा करत बंद आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांना माल ठेवण्यास जागा नसल्याने माल भिजल्याच्या घटनाही घडत आहेत.
व्यवसाय बंद, कर्जवसुली मात्र सुरू
डाेणगाव : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लाॅकडाऊन करण्यात आले आहे. अनेक शहरांसह ग्रामीण भागांतही जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली आहेत. मात्र, कर्ज वसुली सुरू असल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
पूनम चव्हाण गुणवत्ता यादीत
बुलडाणा : पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी पूनम विलास चव्हाण हिने सत्र २०१९-२० च्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. दीपक लद्धड, सचिव डॉ. संगीता लद्धड यांनी तिचे काैतुक केले.